- सावली तालुक्यातील जांब रैयतवारी येथील घटना
सावली -
सावली तालुक्यातील जांब रैयतवारी गावातील बाळकृष्ण भांडेकर हे आपल्या शेतात धान पिकाची रोवणी करीत होते. त्यांनी आपले बैल नांगराला जुंपुन चिखलटी करून झाल्यावर बैलांना विश्रांती घेण्याकरिता दुपारी २ वाजताच्या सुमारास बैलांना चारा टाकून झाडाला बांधून ठेवले व परे खोदण्याचे कामात मग्न झाले असताना जंगल परिसराला शेत शिवार लागून असल्यामुळे जंगल परिसरात भटकणाऱ्या वाघाने अचानक झाडाला बांधून ठेवलेल्या बैलांवर हल्ला केला. बैलांचा हंबरडा पाहून शेतात काम करत असलेले बाळकृष्ण भांडेकर यांनी बैलाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा वाघाने बैलावर हल्ला केलेला पाहून ते काही क्षणासाठी भयभीत झाले. परंतु आपले बैल मरणाच्या दारात पाहून त्यांनी मोठ्याने आरडाओरडा करून आजूबाजूला असलेल्या शेतकरी बांधवांना आवाज देऊन बैलाला वाचवण्यासाठी धावपळ केली. परंतु इतर शेतकरी येईपर्यंत वाघाने आपले काम फत्ते करून बैलाला ठार केले होते. प्रत्यक्ष डोळ्यादेखत वाघाने बैलाला पकडुन ठार केलेले पाहून शेतकरी भयभीत झाले. दिवसाढवळ्या असा अचानक झालेला वाघाचा हल्ला शेतकरी बांधवांसाठी धोकादायक झालेले आहे. आजूबाजूच्या शेतात काम करणारे सर्व शेतकरी बांधव मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे वाघ जंगल परिसरात पसार झाला. परंतु शेती जंगल परिसराला लागून असल्यामुळे त्यांना शेतीचे कामासाठी शेतावर जावेच लागते. परंतु आजच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा आणि ठार करण्यात आलेल्या बैल मालकाला लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी ही मागणी वनविभागाकडे करण्यात येत आहे. व्याहाड बूज., सामदा आणि वाघोली बुट्टी येथील हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच आता ही सुध्या घटना घडलेली आहे. झालेल्या घटनेची माहिती वनविभागाला दिली असता आज बकरी ईद असल्यामुळे आम्ही उदयाला येऊ असे सांगितले. होत असलेल्या घटना पाहता वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सावली तालुक्यात आताच आठवड्यात तिन घटना झाले असताना वनविभागाला बंदोबस्त करण्यास अपयश येत आहे. आताच रैयतवारी येथे एक बैल ठार झाल्याची घटना माहीत झाली. त्यामुळे शेतकरी भयभित झाले आहेत. याची त्वरीत दखल घेवुन वाघाचा व बिबट्टयाचा बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा अशाप्रकारची पुन्हा घटना घडल्यास वनविभागासमोर शेतकऱ्याना घेवुन आंदोलन करण्यात येईल.
राकेश गोलपल्लीवारग्रापं सदस्य व तंटा मुक्त समीती अध्यक्ष जिबगांव
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.