Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिल्हा कारागृहात कैद्याची गळफास घेत आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहात हत्येची शिक्षा भोगत असलेल्या 25 वर्षीय आरोपीने आज दुपारी अडीच वाजताच...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहात हत्येची शिक्षा भोगत असलेल्या 25 वर्षीय आरोपीने आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने जिल्हा कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली. उमेश दामाजी नैताम वय २५ असे मृत कैद्याचे नाव आहे.  हा आरोपी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तहसील येथील साखरी टोला येथील रहिवासी आहे.
उमेश नैताम हा आरोपी खुनाच्या आरोपाखाली चंद्रपूरच्या जिल्हा कारागृह वर्ग -१ मध्ये अनेक दिवसापासून शिक्षा भोगत होता पण आज अचानक त्याने कारागृहाच्या आवारातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कारागृहातील अधिकाऱ्यांना मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृताला त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. जेल प्रशासनाकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top