- राजुरा येथील युवक पोलिसांच्या ताब्यात
बल्लारपूर -
दि. १९ जुलै २०२१ रोजी बल्लारपूर-राजुरा मार्गावरील निर्भय पेट्रोल पंपावर रात्रौ अंदाजे १ ते २ वाजताच्या सुमारास काळया-लाल रंगाची मोटर सायकलवर दोन ईसम पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने येवुन नोजल वर्करला बंदुकीचा (देशी कट्टया सारखा) हत्याराचा धाक दाखवुन त्याचे कडुन २६००/- रु नगदी रोख रक्कम जबरीने घेवुन गेले. त्यानंतर त्याचे ताब्यातील मो.सा. मध्ये ५००/- रु. चे पेट्रोल टाकुन त्याचे पैसे न देता निघुन गेले अशा फिर्यादी नामे प्रकाश महादेव वैदय वय २९ वर्षे धंदा नोजल वर्क रा. विरुर, ता. राजुरा, जि.चंद्रपुर यांचे तोंडी रिपोर्ट वरुन बल्लारशाह पोलीस स्टेशन मध्ये अप क्रं. ८१८/२०२१ कलम ३९२,५०६ भा.द.वी. सहकलम ३,२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी घटनास्थळाचा तांत्रीक अभ्यास करत अज्ञात आरोपींचा शोधसाठी वेगवेगळे पथक तयार केले. तपासा दरम्यान पो.स्टे. सिंदेवाही हद्दीतील पेट्रोल पंम्पावर सदर वर्णनाचे इसमानी त्याचे ताब्यातील काळया-लाल रंगाची पल्सर मोटर सायकलनी जबरी चोरी करुन पळुन जात असताना आरोपीतांचा लोकांनी पाठलाग केला असता ते मोटार सायकल वरुन पडल्याने ते जागेवर मोटर सायकल टाकुन पळुन गेले. त्यावेळी सदर मोटर सायकलचा तपास केला असता ही आसीफाबाद राज्य तेलंगाना येथुन दि. १८ जुलै २१ चे २३:०० वा. चे दरम्यान चोरी गेल्याचे निष्पन्न झाले. त्याचा तांत्रीक अभ्यास करुन हे अज्ञात आरोपी हे सोनीया नगर वार्ड राजुरा येथील असल्याचे समजले. त्यावेळी त्याचे शोध कामी मुखबीर लावले असता गोपनीय माहिती वरुन आरोपी नामे अनिल रमेश सकनारे वय २१ धंदा मजुरी रा. सोनीया नगर वार्ड राजुरा यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली असुन उर्वरित तपास पो.स्टे. बल्लारशा हे करित आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागिय पोलीस अधीकारी राजुरा राजा पवार यांचे मार्गदशनात पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सपोनि विकास गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलीस स्टाफ यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.