Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरपना बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्धार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"रणवीन स्वातंत्र्य कोणा मिळाले" लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ  शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना -...
  • "रणवीन स्वातंत्र्य कोणा मिळाले"
  • लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ 
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी नागपूर येथील विदर्भ चंडिका मंदिर समोर भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने तात्काळ विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे, अन्यथा भाजपाने विदर्भातून चालते व्हावे, असा नारा देत संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करीत आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात विदर्भातील कार्यकर्ते व नागरिक व महिला यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष, माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी केले. कोरपना येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीत अँड.चटप बोलत होते.
विदर्भात सातत्याने सुरू असलेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र, कमी न होणारे बालक व गर्भार मातांचे कुपोषण, वाढत चाललेला बेरोजगारीचा डोंगर, घटलेली लोकप्रतिनिधींची संख्या व राज्याच्या अर्थसंकल्पाला सन 2020-21 व 2021-22 या दोन्ही आर्थिक वर्षात असलेली निधीतील कपात, वार्षिक महसुली उत्पन्नाच्या दीड पट झालेला कर्जाचा डोंगर, केंद्राने राज्याची देणी देण्यास सुरु असलेली टाळाटाळ व चालढकल, राज्याची बुडालेली अर्थव्यवस्था व दिवाळखोरीकडे चाललेली वाटचाल व देशात नंबर एक चे कर्जबाजारी राज्य या सर्व बाबी विचारात घेता सर्व प्रश्नाचे एकमेव उत्तर विदर्भाचे स्वतंत्र राज्य हेच आहे, असे प्रतिपादन यावेळी अध्यक्षपदाहून बोलतांना अँड.वामनराव चटप यांनी केले.
कोरपना येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी 'रणवीन स्वातंत्र्य कोणा मिळाले' या स्वातंत्र्यलढ्यातील अनुभवाची जाण ठेऊन 'लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ' असा निर्धार करीत कार्यकर्त्यांनी विदर्भाची शपथ घेतली. या बैठकीला माजी आमदार अँड.वामनराव चटप, अरुण पाटील नवले, नीलकंठ कोरांगे, अँड. श्रीनिवास मुसळे, सुदाम राठोड, कपिल इद्दे, बंडू पाटील राजूरकर, रमाकांत मालेकर, मदन सातपुते, प्रविण सावकार गुंडावार, रमाकांत मालेकर, अविनाश मुसळे, युवा तालुकाध्यक्ष कार्तिक गोलावार, शहर अध्यक्ष मोहम्मद खान, प्रभाकर लोढे, प्रविण एकरे, नगरसेवक मधुकर चिंचोलकर, पद्माकर मोहितकर, रामदास कांबळे, सरपंच सत्यवान आत्राम, पांडुरंग आसेकर, अनंता गोडे, विकास दिवे, उपसरपंच गुड्डू काकडे, सुनील आमने उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top