- आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत
- स्वच्छतेचे वाजले तीन तेरा
गडचांदूर -
मागील महिन्याभरापासून नांदा नांदाफाटा परिसरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे यात दोन जणांचा नाहक बळी गेला असून अनेक जण रुग्णालयात भरती होऊन उपचार घेत असल्याची माहिती आहे तर काही जणांची प्रकृती अत्यंत खराब असल्याचे बोलले जात आहे. नांदाफाटा परिसरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असून डेंग्यूच्या साथीवर उपायोजना करण्याऐवजी आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याने लोकप्रतिनिधींनी आता तरी त्यांना जाग आणण्याची गरज आहे.
नांदा गावात मागील महिन्याभरापासून डेंग्यूची साथ असून दररोज पंधरा वीस रुग्ण डेंग्यूने बाधित होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डेंगुमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला असून आता हर्षाली सुनील वाटेकर या नऊ महिन्याच्या बालिके ला पण आपले जीव गमावले आहे. गावातिल अजुन काही जणांची प्रकृती खालावली आहे. नागरिकच काय येथील डाॅक्टरांना सुद्धा डेंगुची लागण झाली आहे. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांनी आरोग्य विभागाला नांदाफाटा येथे आरोग्य तपासणी शिबिर लावून डेंग्यू तापावर नियंत्रण मिळविण्याकरिता उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. परंतु आरोग्य विभागाने अद्याप पावतो कुठल्याही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. नांदाफाटा परिसरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहे. यामुळे डास उत्पत्ती होत असून डेंग्यू, चिकन गूनिया, मलेरिया सारखी रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयआयटी विद्यार्थ्यांचा मृत्यु व नऊ महिन्यांच्या बालिकेचा नाहक बळी यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासना विरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे. आतातरी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्याची नागरिकांनी मागणी केली आहेत.
बातम्या अधिक आहेत......
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.