- आयआयटी झालेला नवयुवक धम्मदीप करमनकरचा नागपुरात उपचारा दरम्यान मृत्यू
- जिल्हा डेंगू नियंत्रक पथकाने कॅम्प लावण्याची गावकऱ्यांची मागणी
- डेंग्यू आणि मलेरिया रोगाचे वाढत आहे रुग्ण ; फवारणी करण्याची मागणी या आशयाखाली आमचा विदर्भ ने लावले होते वृत्त
गडचांदूर -
कोरपना पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असलेल्या कालीचरण करमनकर यांचा 21 वर्षाचा धम्मदीप नावाचा मुलगा हा आयआयटी शेवटच्या वर्षाला असतानाच त्याला एका मोठ्या कंपनीमध्ये त्याला नोकरीसुद्धा प्राप्त झाली होती. मात्र वर्क फ्रॉम होम सुरू असताना अचानक त्याला डेंग्यूची लागण झाली व उपचारार्थ चंद्रपुरला भर्ती कर्ण्यात आले होते. प्लेटलेट संख्या आणखी कमी झाल्याने त्याला काल रात्रीच नागपूर येथे भरती करण्यात आले. मात्र आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे परिसरामध्ये भीती सदृश्य वातावरण निर्माण झाले असून डेंग्यू सदृष्य आजाराचे अनेक रुग्ण सद्यस्थितीत गावात व आजूबाजूच्या परिसरात असल्याचे चित्र दिसून येत असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेने नांदा फाटा परिसरामध्ये डेंग्यू नियंत्रक पथकाचे कॅम्प लावावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. नांदा गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतीचे 95% बांधकाम पूर्ण झाले आहे. नांदा आणि जवळपास गाव परिसरात डेंग्यू आणि चिकन गुनियाचा उद्रेक बघता प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे. ग्राम पंचायत प्रशासनाने सुद्धा स्वच्छतेचा बाबतीमध्ये जागरूकता निर्माण करून विविध आजार नियंत्रण फवारण्या लवकरात लवकर कराव्या अशी मागणी होत आहे तसे जिल्हाधिकारी तर्फे सुद्धा आदेश आलेले आहे.
अगदी उमेदीच्या काळात तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेला मुलगा अचानकपणे निघून गेल्याने करमनकर परिवारा वरती दुःखाचा डोंगर कोसळला असून आज संध्याकाळी नांदा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
मच्छरांचा वाढता हैदोस बघता १० जुलै ला आमचा विदर्भ ने "डेंगू आणि मलेरिया रोगाचे वाढत आहे रुग्ण ; फवारणी करण्याची मागणी" या आशयाखाली लावले होते वृत्त लावले होते. त्याचवेळी संबंधित विभागाने फवारणी व तत्सम उपाय केले असते तर एका होतकरू तरुण युवकाचा नाहक बळी गेला असता अशी चर्चा गावात सुरु आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.