Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: डेंग्यू आणि मलेरिया रोगाचे वाढत आहे रुग्ण ; फवारणी करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - पावसाळ्याला सुरूवात झालेली आहे. त्यामुळे सर्वत्र चिखल आणि घाणीचे साम्राज्य प्रस्थापित हो...

धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
पावसाळ्याला सुरूवात झालेली आहे. त्यामुळे सर्वत्र चिखल आणि घाणीचे साम्राज्य प्रस्थापित होत आहे. जागोजागी साचलेल्या पाण्याच्या डोबाळात डासांची पैदास वाढण्याची शक्यता असते. म्हणून नगरपालिका तर्फे डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्याची आवश्यकता आहे. गावातील नाल्यांची आणि कचरा कुंडीच्या ठिकाणी सफाई करून स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
नांदा फाटा येथेही पिंपळगाव रोड वर जगोजागी कचऱ्याचे ढीग जमलेली दिसत आहे. राजाराम शर्मा यांच्या घरापुढे, शिवाजी शाळेच्या गेट जवळ, श्रीवास्तव ऑफिसच्या बाजूला, पेट्रोल पंपच्या समोर कचऱ्याचे ढीग पावसाच्या पाण्याने ओले होऊन त्यातून सगळीकडे दुर्गंध पसरले आहे. दुर्गंधीमुळे जवळपास राहणाऱ्या लोकांचा कमालीचा त्रास सहन करीत आहे. त्यामुळे त्या रोडवर राहणाऱ्या ग्रामस्थांची आणि रोड वर ये जा करणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परिसरातील रोडलगतचा पूर्ण कचरा लवकरात लवकर साफ करून सर्व घाणीच्या ठिकाणी आणि गावातील नालीत फवारणी करण्याची गरज आहे. अन्यथा मलेरिया आणि डेंग्यू सारखे आजार झपाट्याने वाढल्याशिवाय राहणार नाही. दरवर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत डेंग्यू आणि मलेरिया चे रोग वाढण्याचे दिसून येते.

पावसाळ्याच्या दिवसात या गोष्टींवर लक्ष ठेवा
  • डेंग्यूचे मच्छर साचलेल्या पाण्यात होतात. म्हणुन घरात आणि आजुबाजूच्या परिसरात पाणी साचू देऊ नका.
  • कूलरमध्ये असलेले पाणी २ ते ३ दिवसांमध्ये नक्की बदला.
  • घराच्या आजूबाजूच्या नाल्यांमध्ये एंटी लार्वाचा फवारा मारा.
  • घरात लादी पुसणाऱ्या पाण्यात केरोसिन किंवा फिनायल टाकून लादी पुसा.
  • जेव्हा घरातून निघाल, तेव्हा पुर्ण बाह्यांचे कपडे घाला, शॉर्ट्स घालण्याचे टाळा.
  • मच्छर गडद रंगाकडे आकर्षित होतात म्हणून फिकट रंगाचे कपडे घाला.
  • गडद सुगंधाचे फर्म्यूम टाळा, कारण मच्छर स्ट्रॉन्ग स्मेलकडे आकर्षित होतात.
  • झोपण्याच्या आधी हात-पाय आणि शरिराच्या उघड्या अंगावर
  • व्हिक्स लावा. त्यामुळे मच्छर जवळ येणार नाहीत.
  • तुळशीचे तेल, पुदिन्याच्या पानांचा रस, लसणाचा रस किंवा झेंडूच्या फुलांचा रस शरीरावर लावल्याने मच्छर तुमच्यापासून लांब राहतील.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top