Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मांडवी शिवारात 'रंगीला' सह 4 वाघांचे अस्तित्व
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुरक्षेचा उपाय शिवारालगत जंगलाला तार कम्पाउंड करण्यात येणार मांडवी, पिवरडोल, गवारा या गावांचा समावेश प्रेम नरडलवार - आमचा विदर्भ प्रतिनिधी झ...
  • सुरक्षेचा उपाय शिवारालगत जंगलाला तार कम्पाउंड करण्यात येणार
  • मांडवी, पिवरडोल, गवारा या गावांचा समावेश
प्रेम नरडलवार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
झरीजामणी -
झरीजामणी तालुक्यातील जामणी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मानवी शिवारामध्ये अनेक दिवसापासून पट्टेदार वाघाचा मुक्त संचार आहे यामुळे नागरिक भयभीत आहे. यावर उपाय म्हणून काही दिवसातच तार कंपाउंड करण्यात येणार आहे. 
या परिसरात  5 वाघांचे अस्तित्व असून चार दिवसांपूर्वी मांडवी शिवारात दिसलेला वाघ 'रंगीला' नावाने ओळखल्या जातो तसेच  मुख्य वाघीण 'बिजली' हिने मागील 4 वर्षात 10 पिलांना जन्म दिला त्या पैकी 6 वाघांनी मांडवी शिवारातून स्थलांतर केले असून 'बिजली', 'रंगीला' व 'नूरा' आणखी 2 वाघ अश्या 5 वाघांचे अस्तित्व मांडवी शिवारात आहे 'रंगीला' हा थोडा रग्गेल आणि निडर आहे त्यामुळे त्याचे नाव 'रंगीला' ठेवण्यात आले असे जामनी वन परिक्षेत्र अधिकारी एस.बी. मेहरे यांनी सांगितले.
सध्या शेतीचा हंगाम असल्यामुळे वाघाचा मुक्त संचाराने मांडवी शिवारातील शेतकरी चांगलेच भयभीत झाले. वाघाच्या दहशतीने शेतकरी धास्तावले असून शेतात गेला शिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही. याच तालुक्यात चारचार बछड्यांना घेऊन दिमाखात चालणाऱ्या वाघिणी, उन्हाळ्यात पाणवठ्यावर बिनधास्त  पाणी पिण्यासाठी येणारे वाघ हे सगळे झरी तालुक्यातील मांडवी शिवारातील नागरिकांना चांगलेच परिचयाचे झाले आहे. वाघांची संख्या वाढते आहे यामुळे वाघांची शिकार, माणसांवर होणारे हल्ले अशा घटना वाढू लागल्या आहेत. मागील काही दिवसापासून मानव व वन्यजीव संघर्ष पहायला मिळत आहे. यावर वन विभागाने उपाय करणे गरजेचे आहे. या उपयोजने अंतर्गतच वाघांवर पळत ठेवण्यासाठी वनमजुरांची संख्या वाढवण्यात येणार आहे. सध्या या परिसरामध्ये 20 वन मजूर काम करत आहे. जंगलाला लागून असलेल्या शेती जवळील जंगल परिसरामध्ये तार कंपाऊंड करण्याचे ठरले आहे. शामा प्रसाद मुखर्जी जन-वन योजनेअंतर्गत मांडवी गवारा व पिवरडोल या गावां करिता तार कंपाउंड साठी 25-25 लाख निधी प्राप्त आहे. डीपीटीसी च्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती जामनी जामनी वन परिक्षेत्र अधिकारी एस.बी. मेहरे यांनी दिली आहे
तार कंपाउंड झाल्या नंतर वाघांच्या मुक्त संचारावर बंधने येतील तोपर्यंत नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे परिसरामध्ये वाघ दिसताच  इतर नागरिकांना संपर्क करून गर्दी केल्यास वाघ बिथरून नागरिकांना जायबंदी किंवा हल्ला करू शकतो त्यामुळे शक्यतोवर नागरिकांनी त्वरित वनविभागा ला संपर्क करावा जेणेकरून त्या परिसराचा ताबा वन विभागाला घेता येईल व पुुढिल अनुचित घटना टाळता येईल असे आवाहन देखील एस.बी. मेहरे यांनी केले आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top