Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दारूचे दुकान रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी करिता मद्यप्रेमीने नशेत केले रोड जाम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वाहनासमोर चक्क आडवा झपल्याने काहीवेळ वाहतुकीत बाधा वाहतूक रोखून धरल्याने वाहनांची मोठी रांग ; स्थानिकांनी हटविले पोलिस प्रशासनाने अश्या प्रक...

  • वाहनासमोर चक्क आडवा झपल्याने काहीवेळ वाहतुकीत बाधा
  • वाहतूक रोखून धरल्याने वाहनांची मोठी रांग ; स्थानिकांनी हटविले
  • पोलिस प्रशासनाने अश्या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूकरांची मागणी लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री  श्री. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हातील सहा वर्षांपूर्वी लावलेली दारुबंदी उठविण्यात आली. गडचांदुर, नांदा फाटा परिसरातील देशी दारुची दुकाने आणि बिअर बार सुरू झाले आहे. रोडवर असलेल्या काही मद्यविक्रीच्या दुकांनापूढे मद्यप्रेमींची प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. देशी दारूच्या दुकानापुढे मोठ्या संख्येत अस्तव्यस्तपणे उभे असलेले वाहन दिसत आहे. काही अतिउत्साही मद्यप्रेमींमूळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

अशीच एक घटना नांदा फाटा येथील मेन रोड वर असलेल्या एका देशी दारुच्या दुकानासमोर घडली. एका व्यक्ती ने दारूच्या नशेत मेन रोड वर धुमाकूळ घालत दारूचे दुकान रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी करत रोडवरील चालू वाहन अडवून पूर्णपणे वाहतूक बंद केले. नशेच्या अवेस्थेत त्याने ट्रकड्रायव्हरला वाहन स्वतावरून घेऊन जाण्याचे ही सांगत होता. ट्रकचालकाने घाबरून आपले वाहन मागे घेतले. आपली मागणी पूर्ण करण्यासाठी तो रोडवरील चालू वाहनासमोर चक्क आडवा झोपला होता. हे दृश्य बघायला रोडवरील लोकांनी एकच गर्दी केली होती. १५ ते २० मिनिटा पर्यंत रोड वरील वाहतूक रोखून धरल्याने वाहनांची मोठी रांग लागली होती. या पूर्ण घटनमध्ये पोलिस मात्र गैरहजरच होते. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. दारु सुरु झाल्याने काही मद्यप्रेमीं नशा करून रस्त्यावरच झोपलेले ही दिसत आहेत. त्यामुळे रोडवर ये जा करणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा अती उत्साही मद्यप्रेमीवर विशेष लक्ष ठेवून योग्य कार्यवाही करण्यात यावी अन्यथा नशेच्या अवस्थेत रोडवर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस प्रशासनाने चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता नांदा फाटा चौकात एक वाहतूक पोलिस सिपाही तैनात करण्याची मागणी येथील नागरकांनी केली आहे.

बातम्या अधिक आहेत...... 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top