- वेकोली बल्लारपूर एरिया मुख्यमहाप्रबंधक सोबत बैठक संपन्न
धोपटाळा, चिचोली रिकास्ट व पौणी-3 प्रकल्पातील प्रलंबित मागण्यांसदर्भात दि. 09 जुलै रोजी वेकोलि बल्लारपूर क्षेत्राच्या धोपटाळा कार्यालयात पूर्वकेंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वरील प्रकल्पाशी संबंधीत विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला संदर्भात होत असलेल्या विलंबाची कारने विचारण्यात आली. मोबदला व नौकरीसंदर्भातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची सुचना क्षेत्रीय महाप्रबंधकांना केली. यापुढे प्रकल्पग्रस्तांना नोकरीपूर्वी एक महिण्याचे प्रशिक्षण नागपुरला करावे लागणार असल्याच्या निर्णयास विरोध करून ज्या प्रकल्पात नोकरी देण्यात येणार तिथेच प्रशिक्षण देण्यात यावे अशी सुचना बैठकीत केली. प्रकल्पग्रस्तांचा नोकरी व मोबदल्याबाबत जो छळ चालविला गेला आहे तो त्वरीत थांबविण्यात यावा. धोपटाळा युजी टु ओसी तसेच चिचोली रिकास्ट प्रकल्पाची प्रक्रीया पूर्ण झालेली असतांना मोबदला व नौकऱ्या थांबविणे अन्यायकारक असुन त्यावर तातडीने निर्णय घेवून न्याय द्यावा असे सांगीतले.
वेकोलि अधिकाऱ्यांकडुन प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या महाजेनको करीता कोळसा खरेदी करण्याचा करार केला असला तरी त्यावर ठामपणाने निर्णय घेतला गेला नसल्याने प्रकल्पाचे काम सुरू होवू शकलेले नाही. परिणामी प्रकल्पग्रस्तांना नोकरी व मोबदला मिळण्यास अडचण झाली आहे ती त्वरीत दूर करून संबंधीतांना त्वरीत न्याय द्यावा असे सांगीतले. या बैठकीस माजी आमदार एड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, खुशाल बोंडे, मधुकर नरड, राजु घरोटे, प्रशांत घरोटे, कोलगावचे सरपंच पुरूशोत्तम लांडे, सास्ती सरपंच रमेश पेटकर, रामपुरचे सरपंचवंदना गौरकार, सचिन शेंडे आदींची उपस्थिती होती. सदर बैठकीस प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव बहुसंख्येने हजर होते.
बातम्या अधिक आहेत.....
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.