Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आमदाराच्या नातेवाइकाची आजाराला कंटाळून आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली घटना आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नागपूर - आजाराला कंटाळून एका व्यक्तीने गळा कापून आत्महत्या केली. ही...

  • दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली घटना
आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
आजाराला कंटाळून एका व्यक्तीने गळा कापून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. परमेश्वर किसनजी ईटनकर वय ६२, व्यंकटेशनगर कॉलनी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मेडिकल हॉस्पिटल येथे शवविच्छेदन विभागात कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले. त्यांना मुळव्याधीचा त्रास होता. या आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे यांचे ते दूरचे नातेवाइक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

बातम्या अधिक आहेत......

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top