Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शिवसेना शाखा सास्ती तर्फे रक्तदान शिबीर निमित्य रक्तदान करण्याचे आवाहन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्व. निळकंठभाऊ कुडे यांच्या जयंतीनिमित्त १२ जुलै ला रक्तदान शिबीर अनंता गोखरे - उपसंपादक आमचा विदर्भ ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश...
  • स्व. निळकंठभाऊ कुडे यांच्या जयंतीनिमित्त १२ जुलै ला रक्तदान शिबीर
अनंता गोखरे - उपसंपादक आमचा विदर्भ
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने शिवसेना शाखा सास्ती तर्फे स्व. निळकंठभाऊ कुडे यांच्या जयंतीनिमित्त १२ जुलै ला जिप प्राथमिक शाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी १० ते ३ या सुमारास करण्यात येणार आहे. 
रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन सरपंच रमेश पेटकर, उपसरपंच कुणाल नि. कुडे, माजी जिप सभापती श्रीमती सरीताताई नी. कुडे, जिवन बुटले, गणपत कुडे, ग्रापं सदस्य नरसिंग मादर, विलास भटारकर, रवी दुवासी, गणेश चन्ने, संतोष चिंतल्ला, प्रमोद पेटकर, वतन मादर, ग्रापं सदस्य सौ. माया भटारकर, सौ संगीता चन्ने, सौ बेबीनंदा चिंतला, मंगेश लांडे, दिलीप बुटले, गजु वांढरे, प्रकाश भटारकर, श्रीधर मोहीतकर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top