Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नांदा येथे आरोग्य पथकाची भेट ; डासांची उत्पत्ती थांबविण्याचे निर्देश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कूलरच्या आणि साठवलेल्या पाण्यात मिळाल्या डेंग्यूच्या अळ्या डेंगुचा प्रकोप वाढण्याची शक्यता धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर...
  • कूलरच्या आणि साठवलेल्या पाण्यात मिळाल्या डेंग्यूच्या अळ्या
  • डेंगुचा प्रकोप वाढण्याची शक्यता

धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
नांदा गावात मोठ्या प्रमाणात डेंग्यू तापाची लागण झाली असल्याने जिल्हा स्तरावरून नांदा येथे आरोग्य विभागाच्या पथकाने भेट दिली. आरोग्य पथकाने अनेक घरांची पाहणी केली असता तिथे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना काही नागरिकांच्या घरातील कुलरच्या टाकीत व साठविलेल्या पाण्यामध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती करणार्‍या अळ्या आढळून आल्याने तातडीने डांसाची उत्पत्ती थांबविण्याचे निर्देश आरोग्य पथकाने दिले आहे. वेळीच डेंग्यू डासांची उत्पत्ती न थांबविल्यास डेंग्यूचा प्रकोप वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
मागील अनेक दिवसांपासून नांदा गावामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे. त्यातच दोन जणांना जीव गमवावा लागला. आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत असे वृत्त वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाल्याने उशिरा का होईना आज आरोग्य पथकाच्या चमूने नांदा येथे भेट दिली. डेंग्यूच्या उद्रेक ग्रस्त भागात केलेल्या पाहणीत डेंग्यू डासांच्या उत्पत्ती करणार्‍या अळ्या अनेकांच्या घरी आल्यात त्यामुळे स्थानिक आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर व ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांना आरोग्य विभागाच्या टीमने मार्गदर्शन करून डेंग्यू डासांची उत्पत्ती होणार नाही याकरीता आवश्यक उपाययोजना करण्याचे तातडीने निर्देश दिले आहे. स्थानिक आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन काटेकोरपणे कोरडा दिवस पाळावा, प्रत्येक घरांची धूर फवारणी करावी. परिसरातील स्वच्छता करुन कुलरच्या टाक्या, पाणी साठविण्याचे टाके, भांडी, खुल्यावर पडलेले टायर, पाणी साचलेले डबके रिकामे करावे. दर मंगळवारी कोरडा दिवस पाळावा याकरिता ग्रामपंचायतीने मुनादी द्यावी सोबतच नागरीकांनी मच्छरदाणी, मॉस्किटो कॉईल, अगरबत्ती यांचा वापर करीत डासांपासून स्वत:चे रक्षण करुन डेंग्यू पासुन बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नांदाफाटा येथील घाण कचऱ्याचे नियोजन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top