- गेल्या दोन वर्षांत जवळपास साडेसात हजार कर्मचारी निवृत्त
- कर्मचाऱ्यांना अजूनही निवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक लाभ न मिळाल्याने असंतोष
- आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा एसटी कामगार संघटनेने दिला इशारा
या कर्मचाऱ्यांना जे निवृत्ती वेतन मिळते ते अगदीच तुटपुंजे म्हणजे अडीच-तीन हजार रुपये महिना आहे. मात्र निवृत्तीच्यावेळी एकदम मोठी रक्कम मिळते. त्याच्या व्याजातून हे निवृत्त कर्मचारी आपली भविष्याची तजवीज करीत असतात. मात्र दोन वर्षांपासून निवृत्तांची देणी दिलीच नसल्याचा आरोप प्रादेशिक एसटी कामगार संघटनेचे सचिव अजय हटेवार यांनी केला आहे. या निवृत्तांपैकी ६० ते ७० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातही अनेकजण करोनामुळे दगावले पण अजून एसटी प्रशासनाला पाझर फुटलेला नाही. या निवृत्तांचे जवळपास १८० कोटी रुपये एसटी प्रशासनाकडे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
निवृत्तांचे पैसे तसेच अन्य मागण्यांसदर्भात अलीकडेच संघटनेची बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांवरही चर्चा झाली. कर्मचारी संघटना व प्रशासन यांच्यात झालेल्या करारानुसार देय असणारा दोन व तीन टक्के महागाई भत्त्याचा फरक अद्याप दिला गेला नाही. त्याचप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केलेला पाच टक्के महागाई भत्ता अद्याप एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला नाही. प्रशासनाने लेखी देऊनही घरभाडे भत्ता ८,१६,२४ टक्के व वेतनवाढीचा दर तीन टक्के अजूनही कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. एकतर्फी दिलेल्या वेतनवाढीच्या ४८४९ कोटी रुपयांपैकी उर्वरित रकमेचे वाटप तातडीने करून करार पूर्णत्त्वास घेऊन जावा, याही मागण्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या मागण्यांसदर्भात राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना संघटनेतर्फे निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतरही मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन करणार असल्याचे हटेवार यांनी सांगितले.
बातम्या अधिक आहेत......
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.