- प्रसारमाध्यमांकरिता लावून दिलेल्या स्वनियमांच्या प्रसारमाध्यमांनाच पडलाय विसर
राजकीय पार्श्वभूमी असलेल्या चंद्रपुरातील एका सुप्रसिद्ध डॉक्टरांच्या विरुद्ध सध्या राजकीय आक्सापोटी मीडियातून हेतुपुरस्पर बदनामी सुरु असून निराधार वृत्त काही प्रसार माध्यमांत प्रसिद्ध होत आहेत. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष तथा आयएमए चे अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे यांच्या कोविड रुग्णालयाबद्दल कोणतेही तथ्य नसतांना बिनबुडाचे आरोप सध्या करण्यात येत आहेत. ४० खाटांची परवानगी असताना प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून अधिक खाटांचे रुग्णालय चालविले असल्याचा आरोपही करण्यात आला पण यात तथ्य नसून बिनबुडाचे आरोप लावणे सध्या काही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लावणे सुरु आहेत.
कोरोनाची वाढती व्याप्ती बघता एप्रिल महिन्यात जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली झूम आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कोरोनाच्या अनुषंगाने DCH, DCHC रुग्णालय प्रमुखांना तसेच IMA अध्यक्ष, सचिवांना वर्धा जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर कोरोना रुग्णांकरिता स्वतःहून सेवा देत आहेत त्याच धर्तीवर जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयाकरीता सेवा देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सहकार्य व योगदान देण्याचे आवाहन केले होते. याच बैठकीत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शासकीय पोर्टलवर आगोदर रुग्णांची नोंदणी झाल्यानंतर रुग्णालयात भरती करून घ्यावयाचे होते. शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसारच रेमेडिसिवीर, ऑक्सिजन द्यावयाचे होते. रुग्णालयांना यासाठी शासनाच्या विहित नमुन्यात वेळोवेळी अद्ययावत अचूक माहिती भरून पाठवायची होती. कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता एखाद्या रुग्णालयाने रुग्णालयामध्ये खाटांची संख्या वाढविल्यास माहिती द्यावी लागत होती. शासनाच्या पोर्टलमध्ये खाटांची संख्या किती याबद्दलही माहिती वेळोवेळी देण्यात येत होती. रुग्णालयाने कोरोना बाधित रुग्णांकडून किती रक्कम आकारावी यासाठीही शासनाने दर ठरवून दिले होते. काही अपवाद वगळता डॉक्टर्स आपला रुग्ण लवकरात लवकर बरा व्हावा करिता धडपडतही होते. मात्र असे असतांना सुद्धा डॉक्टर मंगेश गुलवाडे यांच्या बद्दल राजकीय आक्सापोटी मीडियातून हेतुपुरस्पर बदनामी सुरु असून अश्याप्रकारामुळे डॉक्टरांचे खच्चीकरण करण्याचे कार्य काही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून होत आहे. प्रसारमाध्यमांच्या अश्या बातम्यांमुळे त्यांची पत कमी होत असून प्रसारमाध्यमांकरिता लावून दिलेल्या स्वनियमांच्या प्रसारमाध्यमांनाच विसर पडला कि काय अशी अवस्था निर्माण झाली आहे.
आमचे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झाले होते. त्यात आमच्या वडिलांची तब्येत अत्यंत खालावली होती. रुग्णालयात बेड उपलब्ध होत नव्हते. सर्वांची धाकधुकी वाढली होती. परिवारातील व मित्रपरिवारातील कुणीही त्यारात्री झोप घेतली नाही. वेळप्रसंगी पैसा कितीही लागो त्याकरिता तेलंगाणा न्यायाची आमची तयारी होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्हाला डॉ. गुलवाडे सरांच्या कोविड सेंटर मध्ये बेड मिळाला. सलग सहा दिवस बाबा रुग्णालयात भरती होते. अत्यंत अल्प आकारणी रुग्णालयाकडून आकारण्यात आली.- अनंता गोखरे
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.