Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वीज पडून लक्कडकोट येथील एक शेतकरी ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खिर्डी शिवारातील घटना विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - आज दुपारी अचानकपणे आलेल्या पावसात वीज पडून वारलु जंगळुजी रामटेके वय ...

  • खिर्डी शिवारातील घटना
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
आज दुपारी अचानकपणे आलेल्या पावसात वीज पडून वारलु जंगळुजी रामटेके वय ४५ राहणार लक्कलकोट या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी २ वाजताच्या दरम्यान खिर्डी शिवारात घडली. खिर्डी शिवार लक्कडकोट पासून २ किमी अंतरावर आहे. 

वारलु रामटेके आपल्या शेतात काम करीत होते, दरम्यान दुपारी अचानकपणे विजाच्या कडकडाटासह पाऊस कोसडू लागला त्यामुळे जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी जात असतानाच वारलू रामटेके यांचेवर वीज पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती शेजारील शेतकऱ्यांना होताच त्यांनी मोक्यावर धाव घेत पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना घटने संदर्भात माहिती दिली. मृतकाच्या मागे आई, बाबा, पत्नी व दोन भाऊ आहेत. 

बातम्या अधिक आहेत.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top