Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पोलिसांच्या मारहाणीत युवक ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संतप्त जमावाची पोलिस ठाण्यावर दगडफेक या घटनेमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसह काही नागरिकही जखमी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स दारव्हा - दारव्हा ये...

  • संतप्त जमावाची पोलिस ठाण्यावर दगडफेक
  • या घटनेमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसह काही नागरिकही जखमी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
दारव्हा -
दारव्हा येथील पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या मारहाणीत एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरातील संतप्त जमावाने पोलिस स्टेशनवर गोटमार केली. ही घटना मंगळवार दिनांक सहा जुलैला रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसह काही नागरिकही जखमी झाल्याचे वृत्त आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सायंकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान दारव्हा शहर पोलिसांनी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील युवकांना पकडून आणले त्यांना नेमकी कुठल्या गुन्ह्यात पोलिसांनी पकडले याबाबत मात्र नेमकी माहिती मिळू शकली नाही. या युवकांना पोलिसांनी पकडून आणल्यानंतर तीनही युवकांना जबर मारहाण केल्याने यातील शेख इरफान शेख शब्बीर वय (वर्ष 27) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे घटनास्थळावर बोलले जात होते.

पोलिसांच्या मारहाणीत या युवकाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने येथील पोलिस स्टेशनवर दगडफेक केली असून शहरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिरिक्‍त कुमक बोलवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

बातम्या अधिक आहेत.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top