- अशी करून घ्या माहिती
- आधार - पॅन कार्ड लिंक करणे खूपच सोपे
- आयकर विभागाच्या वेबसाइटवर पाहू शकता स्टेट्स
- लिंक करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर
नवी दिल्ली -
बँकेपासून ते इनकमटॅक्सपर्यंत अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला आर्थिक व्यवहार करताना कोणतीही अडचण येणार नाही. आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून होती. मात्र, आता कोरोना व्हायरस महामारीमुळे ही तारीख ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, तुमचे आधार आणि पॅन कार्ड आधीपासूनच लिंक आहेत की नाही हे कसे पाहाल ? हे जाणून घेऊया.
तुमचे आधार आणि पॅन कार्ड आधीपासूनच लिंक आहे का ?
- आधार-पॅन कार्ड आधीपासूनच लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी Incometax.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करा.
- येथे Link Aadhaar वर जाऊन Our Services वर क्लिक करा.
- आता Link Aadhaar Know About Your Aadhaar Pan Linking Status वर क्लिक करा.
- हे केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल.
- या पेजवर PAN Card आणि Aadhar Card शी संबंधित माहिती भरा.
- पूर्ण माहिती भरल्यानंतर View Link Aadhaar Status वर क्लिक करा.
- हे केल्यानंतर तुमचे आधार-पॅन कार्ड लिंक आहे की नाही याचे माहिती मिळेल.
जर तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर तुम्ही घरबसल्या लिंक करू शकता. यासाठीची प्रोसेस जाणून घेऊया.
कसे लिंक कराल आधार आणि पॅन कार्ड ?
- यासाठी आयकर विभागाची अधिकृत वेबसाइट https://incometaxindiaefiling.gov.in वर जा.
- येथे होम पेजवर Link Aadhaar चा पर्याय दिसेल.
- यावर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो उघडेल. त्यात संपूर्ण माहिती भरावी लागेल.
- येथे पॅन, आधार नंबरसह इतर माहिती व कॅप्चा कोड टाका.
- पूर्ण माहिती भरल्यानंतर Link Aadhaar आधारवर क्लिक करा. हे केल्यानंतर तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक होईल.
- पॅन आणि आधार लिंक झाले की नाही याची माहिती स्क्रीनवर दिसेल.
बातम्या अधिक आहेत......
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.