Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वाढत्या महागाई विरोधात यंग चांदा ब्रिगेडचे गांधी चौकात जनआक्रोश आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सरकार विरोधात नारेबाजी, जिवनावश्यक वस्तुंची दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - गॅस सिंलेडर, पेट्...

  • सरकार विरोधात नारेबाजी, जिवनावश्यक वस्तुंची दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
गॅस सिंलेडर, पेट्रोल-डिझेल व जिवनावश्यक वस्तुंच्या दरवाढी विरोधात आज मंगळवारी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत शहरातील गांधी चौकात जनआक्रोश आंदोलन केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, सायली येरणे, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, कल्पना शिंदे, रुपा परसराम, कविता शुक्ला, अनिता झाडे, शमा काझी, अल्का मेश्राम, दुर्गा वैरागडे, कौसर खान, शांता धांडे, वैशाली मेश्राम, विजया बच्छाव, आशा देशमूख, वैशाली रामटेके, विमल कातकर आदिंची उपस्थिती होती.

सरकारने सर्वसामान्यांनी फसवणूक केली असून या सरकारच्या काळात खाद्य तेल, पेट्रोल - डिझेल, गॅस सिंलेडर व जिवणावश्यक वस्तुंच्या दराने आजवरचे सारेच विक्रम मोडून महागाईचा उच्चांग गाठला आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी असून जनतेची आर्थिक लुट करणारी आहे. आज सगळ्याच वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. बाजारातील अन्नधान्य, भाजीपाला, खाद्य तेल, फळभाज्या इत्यादी सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत दिवसागणिक भरमसाठ वाढ होत आहे. मागील काळात पाच राज्यात झालेल्या निवडणुकानंतर देशात पेट्रोल, डिझेल व एल पी जी गॅसच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल आज घडीला १०० रुपयाच्या वर तर डिझेल सुद्धा शंभरीच्या घरात पोहचले आहे. घरगुती गॅस सुद्धा ९०० रुपयाच्या जवळ पोहचला आहे. मागील दोन वर्षाच्या काळात कोरोना महामारीमुळे आधीच मध्यमवर्गीय, गरिबांच्या  रोजगारावर गदा आली आहे. रोजगारच्या अभावात वाढलेल्या या महागाईमुळे संपूर्ण देशात दारिद्रय सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, इंधन दरवाढ महागाई बेरोजगारी विरोधात यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने आज जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हातात गॅस सिलेंडरचे प्रतिकात्मक फलक घेवून जैन भवन ते गांधी चौक असा मोर्चा काढत नारेबाजी केली. यावेळी गांधी चौकात दरवाढी विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात. सर्व सामान्यांचा जिवावर उठलेली ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला करण्यात आली. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक, कलाकार मल्लारप, जितेश कुळमेथे, विलास वनकर, विश्वजीत शाहा, अजय दुर्गे, सलिम शेख, आनंद रणशूर, हरमन जोसेफ, विनोद अनंतवार, आनंद इंगळे, गौरव जोरगेवार, अबरार सय्यद, चंद्रशेखर देशमुख आदिंनी परिश्रम घेतले या आंदोलनात यंग चांदा ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या अधिक आहेत.....

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top