Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज आहे. या शिक्षणामुळेच मानवाचा सर्वांगीण विकास होतो. यादृष्टीने आद...
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -

शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज आहे. या शिक्षणामुळेच मानवाचा सर्वांगीण विकास होतो. यादृष्टीने आदिवासी भागातील शाळा सोयीसुविधांनी अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत उच्च व तंत्रशिक्षण, नगर विकास, आदिवासी कल्याण, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोरपना येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित मेळाव्यात व्यक्त केले.
याप्रसंगी अर्जुनी मोरगाव चे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक संजय वैद्य, युवक अध्यक्ष नितीन भटारकर, जगदीश जुनघरी, अरुण निमजे, सय्यद आबिद अली, महिला अध्यक्ष बेबीताई उईके, तालुकाध्यक्ष शरद जोगी, मेहमूद मुसाभाई, नगरसेवक सुहेल अली आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुक्यातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरपना येथे  विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरू करणार
कोरपना येथे विज्ञान व वाणिज्य विद्याशाखेचे पदवी-पदव्युत्तर महाविद्यालय नाही. यादृष्टीने येथे या विद्याशाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत राज्याचे तंत्रशिक्षण राज्यमंत्री तनपुरे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले.





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top