- खड्डे बुजविण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर नालीचा मलबा
- नांदा ग्रामपंचायतीचा प्रताप
गडचांदूर -
नांदाफाटा बाजारपेठेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेला पाणी साचत असल्याने नांदा ग्रामपंचायतीच्या आदेशाने चक्क नालीचा घाणेरडा मलबा गड्ड्यात टाकल्याने सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुरुम टाकण्याऐवजी नालीचा मलबा टाकल्याने ग्राम पंचायतच्या या प्रतापामुळे भाजीपाला दुकानदार आणि गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नांदाफाटा बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या कडेला अल्ट्राटेक कंपनीतील जड वाहने थांबत असल्याने ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविणे अपेक्षित होते, पण या खड्ड्यांमध्ये नालीतून उपसा केलेला मलबा टाकल्याने मागील काही दिवसांपासून या ठिकाणी दुर्गंधी पसरली असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाईलाजाने दुर्गंधीमध्येच येथील भाजीपाला विक्रेत्यांना भाजीपाला विकावा लागत आहे. नांदा ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरने नालीतील मलबा टाकल्याची माहिती मिळाली. रस्त्याच्या कडेला मुरूम टाकण्याऐवजी नालीतील घाणेरडा मलबा टाकल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. येथील मलबा हटवून तातडीने मुरूम टाकण्याची मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
नांदा चे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, "त्या गड्ड्यामध्ये भाजी पाल्याच्या कचरा जमा होऊन दुर्गंध येत असल्यामुळे ते गड्डे भरण्यात आले होते. त्या नालीचा मलब्यावर आम्ही लवकरच चुरी टाकणार आहो. काही दिवसनंतर ते मलबा स्वतःच वाळून बसून जाईल. विरोध करणाऱ्यांना विरोध करू द्या, आम्ही आमचे काम करत आहो"
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.