- आसन खुर्द येथील घटना
- नाल्यातून जेसीबीने वाळूचा अवैध उपसा
- महसूल विभाग झोपेत किंवा कोमात गेल्याची चर्चा
कोरपना / गडचांदूर -
दुचाकीला अवैध रेतीची वाहतूक करणारा करणाऱ्या ट्रॅक्टर धडकल्याने दुचाकीवर स्वार युवकाला जीव गमवावा लागला. ही घटना 17 जुलैला रात्री 10.30 वाजताच्या सुमारास आसन खुर्द नाल्याजवळ घडली. प्रशिक सुरेश शेंडे (23) रा. आसन खुर्द असे मृतक युवकाचे नाव आहे. तो नांदाफाटा येथे मावशीच्या घरी जेवण करून गावी परतत असताना अगदी गावाजवळ त्याची दुचाकी ला ट्रॅक्टरने धडक दिली. डोक्याला गंभीर दुःखापत झाल्याने तो तिथेच पडून राहिला. धडक देताच ट्रॅक्टर ने पोबारा केला. घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच त्वरित उपचारासाठी हलवत असताना प्रशिकचा मृत्यू झाला. गावलगतच्या नाल्यात मधुकर किन्नाके यांच्या शेताजवळ जेसीबीने वाळूचा अवैध उपसा करून तीन ट्रॅक्टरने वाहतूक सुरू होती. त्यापैकी पिपर्डा येथील एक ट्रॅक्टर आसन खुर्द येथे रेती टाकून पुन्हा रेती आणायला जात असताना दुचाकी ला ट्रॅक्टर ने धडक दिल्याने प्रशिक चा जीव गेला.
गडचांदूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालक-मालक तिखट याला अटक केली असून ट्रॅक्टर जप्त केला आहे. अगदी गडचांदूर-कोरपना राज्य मार्गालगत जेसीबीने उपसा करण्याची हिम्मत केली जात असेल तर महसूल विभाग झोपेत आहे किंवा कोमात गेल्याची चर्चा सुरु आहे. ट्रॅक्टरचालकासह महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.