Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पोलिसांच्‍या मारहाणीमुळे मृत झालेल्‍या अनिल मडावी यांच्‍या मृत्‍युची सखोल चौकशी करावी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. सुधीर मुनगंटीवार यांची पोलिस अधिक्षकांकडे मागणी गृहमंत्र्यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे दिले आश्वासन शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्र...
  • आ. सुधीर मुनगंटीवार यांची पोलिस अधिक्षकांकडे मागणी
  • गृहमंत्र्यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे दिले आश्वासन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर - 
राजुरा तालुक्‍यातील विरूर स्‍टेशन येथील अनिल गणपत मडावी यांचा पोलिस कस्‍टडीत असताना पोलिसांच्‍या मारहारणीमुळे मृत्‍यु झाल्‍याच्‍या प्रकरणाची सखोल चौकशी करण्‍यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या मागणीसाठी दिनांक १४ जुलै रोजी पोलिस अधिक्षक श्री. साळवे यांची भेट घेत त्‍यांनी शिष्‍टमंडळासह निवेदन सादर केले. यादरम्यान आ. मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली . गृहमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन आ.मुनगंटीवार यांना दिले .
यावेळी पोलिस अधिक्षकांशी झालेल्‍या चर्चेत आ. मुनगंटीवार म्‍हणाले, अनिल मडावी यांच्‍या आई श्रीमती विमल मडावी यांनी यासंदर्भात आपणाकडे तक्रार केलेली आहे. मृतक अनिल मडावी यांचे पार्थीव अजूनही जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयातील शवगृहात ठेवलेले आहे. हा मृत्‍यु पोलिस कस्‍टडीत असताना पोलिसांच्‍या मारहाणीमुळे झाल्‍याचा आरोप श्रीमती विमल मडावी यांनी केलेला आहे. सदर प्रकरणाची एकूणच सखोल चौकशी करून मडावी कुटूंबियांना न्‍याय मिळण्‍याची आवश्‍यकता आहे, असे आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्‍याचे आश्‍वासन पोलिस अधिक्षक श्री. साळवे यांनी दिले.
या शिष्‍टमंडळात चंद्रपूर महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपाध्‍यक्ष रामपाल सिंह, मनपा स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, नगरसेवक संजय कंचर्लावार, वाघूजी गेडाम आदींची उपस्थिती होती.





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top