- शासनाला सादर करावा – आ. मुनगंटीवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
- शोकाकुल लष्करे परिवाराची आ. मुनगंटीवार यांनी घेतली भेट व केले सांत्वन
दुर्गापूर (चंद्रपूर) -
दुर्गापूर येथे १२ जुलै रोजी जनरेटर मधील गॅस गळतीमुळे रमेश लष्करे यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील सहा जणांचा दुर्देवी मृत्यु झाल्याच्या घटनेसंदर्भात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिका-यांसह लष्करे कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. यावेळी मृतक रमेश लष्करे यांची आई श्रीमती नागम्मा लष्करे व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन अर्थसहाय्य मंजूर करावे या मागणीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत निवेदन सादर केले. मृतकांच्या कुटूंबियांना १० लाख रू. चे अर्थसहाय्य मिळण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयाला सादर करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिका-यांना केल्या. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी त्वरीत प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी आ. मुनगंटीवार यांच्यासह महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपाध्यक्ष रामपाल सिंह, चंद्रपूर तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान, पंचायत समिती सभापती केमा रायपूरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास टेंभुर्णे, माजी सरपंच श्रीनिवास जंगमवार, संजय यादव, घनश्याम यादव, नामदेव आसुटकर, रामभाऊ गि-हेपुंजे, अर्चना रायपुरे, दिनेश मेश्राम, मनपा स्थायी समिती सभापती रवि आसवानी, नगरसेवक संजय कंचर्लावार आदींची उपस्थिती होती.
बातम्या अधिक आहेत.....
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.