Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लष्करे कुटुंबीयांची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. जोरगेवार यांच्या मागणी नंतर मृतकाच्या पत्नीला नौकरी देण्याचे सीएसटीपीएसचे मुख्य अभियंता यांचेकडे मागणी शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी ...
  • आ. जोरगेवार यांच्या मागणी नंतर मृतकाच्या पत्नीला नौकरी देण्याचे सीएसटीपीएसचे मुख्य अभियंता यांचेकडे मागणी

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जनरेटरची गॅस गळती झाल्याने एकाच परिवारातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दुर्गापूर येथे घडली होती.दरम्यान आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मृत कुटुंबीयांची भेट घेत या अपघातात बचावलेल्या मृतक रमेश यांच्या पत्नी दासू लष्करी यांना सीएसटीपीएस मध्ये कंत्राटी पद्धतीवर नोकरी  देण्याची मागनी केली . त्यानंतर सीएसटीपीएस चे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनीही ही मागणी मान्य केली आहे.
  रात्रीच्या सुमारास विदुत पुरवठा खंडित झाल्याने  दुर्गापूर येथील रमेश लष्‍करे हे घरातील जनरेटर सुरू करून झोपले होते. दरम्यान जनरेटरचा स्फोट झाल्याने  विषारी धूर घरात पसरला यात गुदमरून कुटूंबातील रमेश लष्‍करे, अजय लष्‍करे, लखन लष्‍करे, कृष्‍णा लष्‍करे, माधुरी लष्‍करे, पुजा लष्‍करे या सहा जणांचा मृत्‍यु झाला. तर यात रमेश यांच्या  पत्नी दासू लष्‍करे या बचावल्या आहे मात्र त्यांची  प्रकृती खराब असल्याने  त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मृत कुटुंबीयांची भेट घेतली.तसेच या अपघातात बचावलेल्या मृतक रमेश यांच्या पत्नी दासू लष्करी यांना सीएसटीपीएस मध्ये कंत्राटी पद्धतीवर नोकरी देण्याची मागणी केली. याबाबत त्यांनी सिएसटीएस चे मुख्य अभियंता पंकज सपाटे  यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्कही साधला आहे. यावेळी दासु लष्करी यांना कंत्राटी पद्धतीवर सीएसटीपीएस येथे नौकरी देण्याबाबत सकारत्मक चर्चा झाली असून दासू लष्करी यांना सीएसटीपीएस मध्ये नौकरी देण्याचे मुख्य अभियंता सपाटे यांनी मान्य केले आहे. दासू लष्करी यांच्या प्रकृतीत सुधारणा होताच सदर नौकरी प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी परिवाराला आर्थिक मदत केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, विश्वजीत शाहा, राशीद हुसेन, आनंद इंगडे आदींची उपस्थिती होती.





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top