Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ग्रामपंचायत सोनापूर येथील संगणक परिचालक पदाची नियमबाह्य भरती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भरती प्रक्रिया रद्द करा युवा कांग्रेस ची निवेदनातून मागणी सुनील किनेकार - आमचा विदर्भ प्रतिनिधी सावली - सावली तालुक्यातील सोनापूर ग्रामपंचाय...

  • भरती प्रक्रिया रद्द करा युवा कांग्रेस ची निवेदनातून मागणी
सुनील किनेकार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
सावली -
सावली तालुक्यातील सोनापूर ग्रामपंचायत अंतर्गत संगणक परिचालक पदाच्या भरती अनियमबाह्य असून संगणक पदाच्या भरती मध्ये घोड झालं  असल्याचे गावात बोलले जाते आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालक हे पद भरल्या जाते सोनापूर ग्रामपंचायत ने गावांमध्ये संगणक पदा करिता भरती घेण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता व दवंडी किंवा नोटीस बोर्ड न लावता आपल्या मर्जीने संगणक परिचालक पदाचे भरती करण्याचा प्रयत्न केला असून या पदभरती वर   गावातील युवकांनी आक्षेप घेत पंस संवर्ग विकास अधिकारी व पंस सभापती विजय कोरेवार यांना युवा काँग्रेस अविनाश भुरसे यांच्या नेतृत्वात संगणक परिचालक पदासाठी पात्र युवकांनी निवेदन देऊन संगणक परिचालक पद रद्द करण्याची मागणी केली आहे.  

या पूर्वी ग्रामपंचायतच्या संगणक परिचालक पदी मुकेश भुरसे होते त्यानी ग्रामपंचायत निवडून लढली व ते निवडणूक जिंकली त्यामुळे त्यांनी संगणक परिचालक पदाचा राजीनामा देत उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारला त्यामुळे संगणक परिचालक पद रिक्त होते सदर पद भरण्याकरिता महाराष्ट्र शासन निर्णयनुसार पंचायत समितीकडून परिपत्रक ग्रामपंचायत ला पाठवण्यात आले त्या परिपत्रकानुसार गावामध्ये जाहीरनामा अधिसूचना दवंडी देऊन पद भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्या येणे तरतूद असताना तसे न करता पूर्ण गावभर निवेदन न लावता फक्त अश्या ठिकाणीच निवेदन लावण्यात आले जेणेकरून जास्त लोकांना माहित होऊ नये. गावात दवंडीही फिरविण्यात अली नसल्याचा आरोपही नागरिकांनी लावला आहे. 

ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे आपले हितसंबंध जोपासत एकच अर्ज आले असून असे भासवून एकच अर्जदाराचा विचार करून संगणक परिचालक साठी निवड झाले असल्याची चर्चा सध्या गावात सुरु आहे. याबद्दल गावात सुशिक्षित बेरोजगारांना माहित होताच गावात खळबळ उडाली असून सदर निवडप्रक्रियेत गावांमध्ये प्रसिद्धी परिपत्रक, दवंडी न फिरविल्यामुळे सुशिक्षित युवकांनी नाराजगी व्यक्त केली आहे. याबाबत गावातील नागरिकांनी विचारणा केली असता  भरतीची वेळ गेलेली असून आम्ही दुसऱ्याचा अर्ज स्वीकारणार नाही अशा पद्धतीचे उत्तर दिले. त्यामुळे आता उच्चशिक्षित बेरोजगार असलेल्या अनेक पदवीधारकांना संगणक परिचालक या पद भरतीपासून मुकावे लागेल की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

संगणक परिचालक पदाच्या भरती संदर्भात प्रसिद्धी पत्रके गावभर लावून गावात दवंडी देऊन इच्छुक येणाऱ्या उमेदवाराचे अर्ज स्वीकारून त्यातील योग्य पात्रता असलेल्या उमेदवाराची निवड करण्यात यावी आणि नियमबाह्य पद्धतीने घेतलेले अर्ज रद्द करण्यात यावे यासंदर्भात युवा काँग्रेस यांच्या नेतृत्वात पंस संवर्ग विकास अधिकारी गावंडे साहेब, पंस सभापती विजय कोरेवार यांच्या कडे निवेदन देऊन पदभरती संदर्भात चर्चा करण्यात आली. याबाबत नियमबाह्य भरती रद्द करून मुदत वाढ देऊन पुन्हा गावात प्रसिद्ध करून सुशिक्षित बेरोजगार यांच्याकडून अर्ज मागविण्यात येणार असल्याचे संवर्ग विकास अधिकारी गावंडे साहेब यांनी सांगितले. निवेदन देतेवेळी युवा काँग्रेस अविनाश भुरसे, डोमाजी शेंडे, विकेश भांडेकर, प्रीतम बांबोडे, तलाश गोवर्धन आदी अनेक युवक उपस्थित होते.

संगणक परिचालक पदासाठी तीन-चार ठिकाणी परिपत्रक लावलेले होते मात्र एकच अर्ज आल्यामुळे त्याच उमेदवाराचा विचार करण्यात येईल आणि त्याचीच निवड करण्यात येईल त्यामुळे आम्ही अर्ज घेणार नसून पंचायत समितीने अर्ज घ्यावे.
मुकेश भुरसे, उपसरपंच

ग्रापंने गावांमध्ये प्रसिद्धी परिपत्रके न लावता आपल्याच मर्जीने पद भरण्याचा प्रयत्न चालवला होता अनेक सुशिक्षित बेरोजगार या पदभरती संदर्भात माहिती न मिळाल्याने वंचित राहिले त्यामुळे संगणक परीचालक पदाकरिता दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात येत असून पुन्हा अर्ज मागविण्यात येणार आहे. संगणक परिचालक पद भरण्याचा ग्रामपंचायतला कोणताही अधिकार नाही.
विजय कोरेवार, सभापती पंस सावली

बातम्या अधिक आहेत.... 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top