चंद्रपूर -
दिवंगत माजी आमदार तथा भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे संस्थापक सचिव निळकंठराव शिंदे यांच्या जन्मदिवसाचे औचीत्य साधून भद्रावती येथे दिनाक 1 जुलै रोज २०२१ गुरुवारला कोविड-१९ च्या प्रशासकीय निर्देशा चे पालन करीत विविध कार्यक्रमाचे करण्यात आले. भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित डॉ विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावती तर्फे दिव्यांग व गरीब मुलांना शैक्षणिक आर्थिक मदत देण्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी भद्रावती शिक्षण भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक निळकंठराव शिंदे, श्रीमती निलीमाताई निळकंठराव शिंदे, कार्यक्रमच्या अध्यक्ष, संस्थेचे सचिव डॉ कार्तिक निळकंठराव शिंदे, संस्थेचे विश्वस्थ डॉ विशाल निळकंठराव शिंदे , यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मोहनराव पुसनाके व प्राध्यापक डॉ प्रशांत पाठक उपस्थित होते. प्रास्ताविक यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी केले. दिवंगत माजी आमदार तथा भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे संस्थापक सचिव निळकंठराव शिंदे यांच्या जन्मदिवसाचे औचीत्य डॉ जयंत वानखेडे यांनी आपल्या अनुभवाच्या बोलातून स्पष्ठ केले. कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग विद्यार्थी श्रावण नरहरी जीवतोडे याला पुरुस्कृत करण्यात आले तसेच कुमारी कल्याणी व अनुष्का शामराव मंडाले यांना सुधा पुरस्कार देवून यांचे शैक्षणिक खर्च भद्रावती शिक्षण संस्थेने करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमासाठी भद्रावती शिक्षण भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक निळकंठराव शिंदे यांनी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे संस्थापक सचिव निळकंठराव शिंदे यांच्या जुन्या आठवणी आपल्या शब्दातून मांडल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती निलीमाताई निळकंठराव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरवर्षी 1 जुलै ते ७ जुलै हा आठवडा जयंती उत्सव मानून साजरा केला जाईल. अशी सूचना भद्रावती शिक्षण भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक निळकंठराव शिंदे यांनी केली. कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. आभार डॉ विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय, भद्रावती चे प्राध्यापक डॉ प्रशांत पाठक यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व प्राध्यापक वृंद, विध्यार्थ्याचे देखील आभार मानले.
बातम्या अधिक आहेत....
बातम्या अधिक आहेत....
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.