राजकीय स्थैर्य आणि विकासाचा संकल्प; राजुरात नवे पर्व
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०६ जानेवारी २०२५) -
राजुरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी नगरविकास आघाडीचे नेते अरुण धोटे यांनी नगर परिषद सभागृह, राजुरा येथे अधिकृतपणे पदभार स्वीकारला. उत्साह, जल्लोष आणि जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडलेला हा पदग्रहण सोहळा राजुरा शहराच्या राजकीय आणि विकासात्मक इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. या सोहळ्याने राजूरात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.
नगराध्यक्ष अरुण धोटे हे शांत, संयमी आणि लोकसंपर्कातून उभे राहिलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. नगरपरिषद, सामाजिक कार्य आणि संघटनात्मक कामाचा त्यांना मोठा अनुभव असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच नागरी सुविधा या विषयांवर त्यांनी सातत्याने अभ्यासपूर्ण भूमिका घेतली आहे. राजुरा शहराचा सर्वांगीण, संतुलित आणि लोकाभिमुख विकास हेच त्यांच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले आहेत.
या गौरवपूर्ण प्रसंगी नगरविकास आघाडीचे शिल्पकार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित असल्याने सोहळ्याचे औचित्य अधिकच वाढले.
पदग्रहण सोहळ्यापूर्वी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि निवडक कार्यकर्त्यांसह राजुराचे आराध्य दैवत भवानी माता मंदिर येथे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. धार्मिक आस्था आणि सामाजिक जबाबदारी यांचा समन्वय साधत त्यांनी नव्या कार्यकाळाची सुरुवात केली.
पदग्रहण सोहळ्याला मुख्याधिकारी विवेक चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप, तालुकाध्यक्ष कपिल इददे, राजेंद्र डोहे उपस्थित होते. याशिवाय नगरसेवक स्वप्नील गजानन मोहुर्ले, सिद्धार्थ आस्तिक पथाडे, मंगला पुरुषोत्तम मोकळे, पौर्णिमा गणपत सोयाम, ईश्वर सुधाकर ठाकरे, नीता किशोर बानकर, फरीना शाकीर सय्यद, इंदुबाई विठ्ठल निकोडे, रमेश काशिनाथ नळे, पुनम सारंग गिरसावळे, वज्रमाला अजय बतकमवार, दिलीप मुर्लीधर डेरकर, संध्या चंद्रशेखर चांदेकर, अनंतकुमार गजानन ताजने, अन्नु हरजितसिंग संधू, गीता सिद्धार्थ पथाडे, शेख मोहम्मद जुबेर मो. इस्माईल, एजाज अहमद, किशोर हिंगाणे यांच्यासह नगरविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजुरा शहरातील मायबाप नागरिकांनी नूतन नगराध्यक्षांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला. सर्वसामान्यांच्या अपेक्षा, शहरविकासाची नवी दिशा, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाची आशा व्यक्त करण्यात आली. नवीन नेतृत्वाखाली शहरातील नागरी प्रश्न मार्गी लागतील, विकासकामांना गती मिळेल आणि सर्व घटकांना न्याय मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. पदग्रहण सोहळ्यामुळे राजुरा नगरपरिषदेच्या कार्यकाळाला नवी ऊर्जा मिळाली असून विकासाचा अरुणोदय प्रत्यक्षात उतरेल, अशी सकारात्मक भावना शहरात निर्माण झाली आहे.
#Rajura #ArunDhote #subhashdhote #advwamanraochatap #harjitsinghsindhu #rameshnale #isdharthpathade #geetapathade #anantaatajne #poonamgirsavle #ishvarthakary #swapnilmohurle #MunicipalPolitics #UrbanDevelopment #LocalLeadership #Congress #Nagarpalika #MaharashtraPolitics #PeopleCentricGovernance #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.