आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचांदूर (दि. 06 जानेवारी 2025) -
गडचांदूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रामकृष्ण हॉटेल परिसरात घरासमोर उभी केलेली हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी समक्ष पोलीस स्टेशन गडचांदूर येथे तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, रामकृष्ण हॉटेल गडचांदूर येथे काम करणारे तक्रारदार हे गडचांदूर शहरातील रहिवासी आहेत. त्यांचे जावई, रहिवासी थुठ्रा, यांनी सन 2019 मध्ये हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक MH 34 BP-5358, काळ्या रंगाची, खरेदी केली होती. ही दुचाकी तक्रारदारांचा मुलगा कामावर ये-जा करण्यासाठी नियमितपणे वापरत होता. दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 08.00 वाजताच्या सुमारास, मुलगा आषिश उभरे हा नेहमीप्रमाणे कामावरून घरी आला. त्याने हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक MH 34 BP-5358 घरासमोर उभी करून ठेवली. त्यानंतर तक्रारदार व त्यांचा मुलगा जेवण करून झोपी गेले. सकाळी सुमारे 07.00 वाजताच्या सुमारास तक्रारदार घराबाहेर आले असता, नेहमीच्या ठिकाणी उभी केलेली मोटारसायकल दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, मात्र मोटारसायकल कुठेही आढळून आली नाही. अखेर कोणीतरी अज्ञात इसमाने सदर मोटारसायकल चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.
गडचांदूर शहरात वाढत असलेल्या वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पोलीस यंत्रणेकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.
#Gadchandur #BikeTheft #VehicleTheft #HeroSplendor #CrimeNews #LocalCrime #MaharashtraNews #PoliceInvestigation #PublicSafety #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.