आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०५ जानेवारी २०२५) -
चिमूर शहराला हादरवून टाकणारी खळबळजनक घटना समोर आली असून नेहरू शाळा परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून तरुणाचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपींचा शोध घेत गुन्हा उघडकीस आणला आहे.
दि. ०४/०१/२०२६ रोजी पोलीस स्टेशन चिमूर येथे गृहिणी उषा प्रभाकर उताने, वय ५० वर्ष, रा. तनस कॉलनी, ठक्कर वार्ड, चिमूर यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी नमूद केले की नेहरू शाळा, चिमूर येथे त्यांचा मुलगा आकाश प्रभाकर उताने, वय ३१ वर्ष, रा. तनस कॉलनी, ठक्कर वार्ड, चिमूर हा गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला. डोक्यावर जबर मारहाण झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सदर तक्रारीवरून पोलीस स्टेशन चिमूर येथे गुन्हा क्रमांक ०२/२०२६ अन्वये कलम १०३ (१) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मृतकाने आरोपींना दारू पिल्यानंतर शिवीगाळ केल्याने वाद उफाळून आला, त्यातून झटापट होऊन आरोपींनी मृतकाचा खून केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक ताळीकोटे, पोलीस उपनिरीक्षक देरकर, पोलीस हवालदार सचिन साठे, प्रमोद पढाल, प्रमोद पिसे, डोनू मोहुर्ले, पोलीस अंमलदार सचिन खामनकर, रोहित तुमसरे, फाल्गुन परचाके, रुपेश शामकुळे, विकास बारसागडे, गणेश वाघ, सोनू येलकुचेवार यांचा या पथकात समावेश होता.
या पथकाने अवघ्या तीन तासांत आरोपी सुजल विलास सोनवाने, वय २० वर्ष, रा. नेताजी वार्ड, चिमूर, छगण मोहन दिगोरे, वय २७ वर्ष, रा. नेताजी वार्ड, चिमूर, अनिकेत शेषराव साखरकर, वय २४ वर्ष, रा. नेताजी वार्ड, चिमूर यांना अटक करून खूनाचा गुन्हा उघडकीस आणला. घटनेनंतर चिमूर शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
#ChimurCrime #BreakingNews #MurderCase #CrimeNews #PoliceAction #JusticeForAkash #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.