कोणताही कमिशन नाही, थेट व्यापाऱ्यांना फायदा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 08 जानेवारी 2026) -
ऑनलाईन खरेदीचा वाढता प्रभाव, विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांचे वर्चस्व आणि त्यातून स्थानिक बाजारपेठेला बसणारा फटका हा सध्याचा गंभीर आर्थिक प्रश्न ठरत आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो यांसारख्या ऑनलाईन अॅप्सवरून ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. अनेक वेळा हीच वस्तू स्थानिक बाजारात त्याच दरात किंवा त्याहून कमी दरात उपलब्ध असतानाही ग्राहक ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात. परिणामी स्थानिक व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून विदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत.
या पार्श्वभूमीवर राजुरा तालुक्यातील युवा उद्योजक, अॅप संस्थापक अमित गुप्ता यांनी स्थानिक व्यापाराला चालना देण्यासाठी A2mart हे नवीन ऑनलाईन अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप सध्या राजुरा शहर व परिसरातील २० किलोमीटर क्षेत्रासाठी कार्यरत असून, लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनाही या प्लॅटफॉर्मशी जोडण्यात येणार आहे.
A2mart अॅप हे स्थानिक व्यापाऱ्यांसाठी डिजिटल दुकानाची संकल्पना घेऊन आले आहे. ज्या व्यापाऱ्यांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता, कोणतीही वेबसाईट न बनवता, थेट स्थानिक ग्राहकांपर्यंत ऑनलाईन पोहोचायचे आहे, त्यांच्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरणार आहे. व्यापाऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून A2mart अॅप डाउनलोड करून आपल्या दुकानाचे नाव, पत्ता, संचालकांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि उपलब्ध वस्तू व सेवांची माहिती नोंदवायची आहे. त्यामुळे ग्राहकांना थेट स्थानिक दुकानांशी संपर्क साधता येणार असून व्यापाऱ्यांचा ऑनलाईन व्यापार वाढण्यास मदत होणार आहे.
या अॅपमध्ये किराणा, जनरल स्टोअर्स, कपडे, जोडे-चप्पल, बर्तन-भांडे, ग्रोसरी, सोलर साहित्य, मोबाईल फोन, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, ऑटोमोबाईल, टायर-ट्यूब, मशिनरीज, प्रिंटिंग, बोर्ड-बॅनर, फर्निचर, वेल्डिंग यांसह विविध प्रकारचे दुकानदार सहभागी होऊ शकतात. याशिवाय इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंग, मोबाईल रिपेअरिंग, टू व्हीलर व फोर व्हीलर रिपेअरिंग, हॉटेल बुकिंग, लॉन, लॉज, प्लॉट खरेदी-विक्री यांसारख्या सेवा देणारे लहान व्यावसायिकही या अॅपवर नोंदणी करून स्वतःचा व्यवसाय ऑनलाईन वाढवू शकणार आहेत.
या संकल्पनेमागील मुख्य उद्देश म्हणजे स्थानिक ग्राहकांचा पैसा स्थानिक बाजारातच फिरता राहावा. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी कितीही व्यापार केला तरी A2mart अॅपकडून कोणतेही कमिशन आकारले जाणार नाही, ही बाब स्थानिक व्यापाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरणारी आहे.
A2mart अॅपच्या आधी अमित गुप्ता यांनी स्थानिक हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी nikart अॅप सुरू केले होते. या अॅपच्या माध्यमातून स्थानिक हॉटेलमधून ऑनलाईन फूड ऑर्डरची सेवा सुरू असून, या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळेच A2mart अॅप सुरू करण्याची प्रेरणा मिळाल्याचे अॅप संस्थापक अमित गुप्ता यांनी ''आमचा विदर्भ'' शी बोलताना सांगितले आहे.
स्थानिक व्यापारी, उद्योजक आणि सेवा पुरवठादारांनी या अॅपचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी 7522993368 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. A2mart अॅपमुळे स्थानिक व्यापाराला डिजिटल बळ मिळणार असून, विदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत स्थानिक बाजारपेठ सक्षम होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
#A2mart #nikart #RajuraNews #VidarbhaNews #AmchaVidarbha #LocalNews #StartupIndia #DigitalIndia #SupportLocal #LocalBusiness #VocalForLocal #MadeInIndia #ShopLocal #LocalEconomy #SmallBusinessSupport #LocalEcommerce #IndianEcommerce #DigitalMarketplace #NoCommission #MerchantFirst #TechForTraders #DigitalEmpowerment #Rajura #Chandrapur #Vidarbha #MaharashtraBusiness #RuralEntrepreneurship #YouthEntrepreneur #GoLocalGoDigital #ThinkLocalBuyLocal #FromLocalToDigital #EmpoweringLocalMarkets

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.