आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (०९ जानेवारी २०२६) -
चंद्रपूरच्या पवित्र भूमीवर अयोध्येच्या दिव्यत्वाचा अवतार घडणार असून, संपूर्ण शहर राममय करणाऱ्या एका भव्य आध्यात्मिक पर्वाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. लखमापूर हनुमान मंदिराच्या तत्वावधानाखाली व श्रीराम कथा सेवा समितीच्या वतीने १४ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘लखमापूर धाम’ चांदा क्लब ग्राउंड येथे भव्य श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कथा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता समाजप्रबोधन, संस्कार जागृती आणि आध्यात्मिक क्रांतीचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, जगप्रसिद्ध मानस मर्मज्ञ, थोर कथावाचक पूज्य राजन जी महाराज आपल्या अमृतमय व ओजस्वी वाणीने प्रभू श्रीरामांच्या चरित्राचा शंखनाद करणार आहेत. त्यांच्या वाणीतून साकार होणारी रामकथा ही भक्तांसाठी केवळ श्रवणानंद न राहता आत्मचिंतनाची प्रेरणा देणारी ठरणार आहे.
पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे जन्म आणि उत्तर प्रदेशातील बलिया येथे संस्कार लाभलेले राजन जी महाराज यांनी लहानपणापासूनच रामचरितमानसाला जीवनाचा आधार मानला. शास्त्रीय संगीताचे सखोल शिक्षण, अध्यात्माची खोल समज आणि साधेपणातून उमटणारी विद्वत्ता यामुळे ते देशातीलच नव्हे तर जगातील अग्रगण्य कथावाचक म्हणून ओळखले जातात.
राजन जी महाराज यांनी भारतातील सर्व राज्यांसह अमेरिका, ब्रिटन, कॅनडा तसेच आखाती देशांमध्येही श्रीराम कथेचा दिव्य गंगाप्रवाह वाहिला आहे. युट्यूब व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रवचनांना कोट्यवधी प्रेक्षक लाभले असून, विशेषतः युवक मोठ्या प्रमाणावर सनातन संस्कृतीशी जोडले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या स्वरात साकारलेली रामभक्तीपर भजने, रामचरितमानसाच्या चौपायांचे भावपूर्ण गायन आणि रसाळ निवेदन थेट श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करते. राम की भक्ति में यासारखी भजने आजही लाखो भक्तांच्या ओठांवर आहेत.
राजन जी महाराज यांच्या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्राचीन रामकथेचा संदर्भ आजच्या सामाजिक वास्तवाशी जोडतात. व्यसनमुक्ती, नैतिक मूल्ये, कुटुंबसंस्था, युवकांचे दिशाभूल होणे अशा विषयांवर ते प्रभावी मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रेरणेतून आजवर असंख्य लोकांनी नशा, मांसाहार व अनिष्ट सवयींचा त्याग करून रामपथ स्वीकारल्याचे अनेक अनुभव समोर आले आहेत.
या भव्य कथेपूर्वी १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता श्री लक्ष्मी नारायण मंदिरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत सुमारे ७ हजारांहून अधिक भक्त सहभागी होणार असून, ५०० मातृशक्ती पारंपरिक वेशभूषेत कलश धारण करून सहभागी होणार आहेत. भजन मंडळ्या, युवकांच्या टोल्या आणि आकर्षक झांक्यांमुळे चंद्रपूरचे रस्ते अक्षरशः अयोध्यामय होणार आहेत.
या संपूर्ण आयोजनास महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ नेते व आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि सामाजिक कार्यकर्त्या सपना मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. श्रीराम कथा सेवा समितीचे अध्यक्ष हरीश भट्टड व समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाची भव्य, शिस्तबद्ध आणि भक्तांसाठी सोयीस्कर अशी आखणी करण्यात आली आहे. लखमापूर धाम येथे दहा हजारांहून अधिक भाविकांसाठी वॉटरप्रूफ मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षित व सुलभ प्रवेश-निर्गमन, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचा विशेष संदेश देण्यात येणार आहे. समितीचे ध्येय जात-पात, भेदभाव विसरून संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र आणण्याचे आहे. कथेच्या दरम्यान नशाविरोधी विशेष संदेश देण्यात येणार असून, त्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
पत्रकार परिषदेत संरक्षक व आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, हा कार्यक्रम केवळ कथा ऐकण्यापुरता मर्यादित नसून अंतःकरणातील राम जागवण्याची संधी आहे. १४ ते २२ जानेवारी दरम्यान दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत प्रत्येकाने या दिव्य कथेत सहभागी व्हावे. या पत्रकार परिषदेस श्रीराम कथा सेवा समितीचे अध्यक्ष हरीश भट्टड, प्रमुख पदाधिकारी दिनेश नाथवानी, चंदनसिंह चंदेल, उमाशंकर सिंह, आनंद झा, विजय शुक्ला, मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, शैलेन्द्र शुक्ल, काशीनाथ सिंह, पिंटू जी तसेच मीना देशकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
#RamKatha #Chandrapur #Ramotsav2026 #LakhmapurDham #ChandaClubGround #SpiritualEvent #RajanJiMaharaj #ManasKatha #RamCharitManas #DivineDiscourse #BhaktiVaani #RamBhakti #SanatanDharma #IndianSpirituality #HinduCulture #AyodhyaSpirit #YouthForDharma #SpiritualAwakening #DeAddictionMovement #ValueBasedLife #Vidarbha #AmchaVidarbha #Maharashtra #ChandrapurDiaries #RamMayChandrapur #AwakenTheRamWithin #BhaktiAndCulture #MLA #SudhirMungantiwa #HarishBhattad #DineshNathwani #ChandanSinghChandel #UmashankarSingh #AnandJha #VijayShukla #drmangeshgulwade #PrakashDharane #ShailendraShukla #KashinathSingh #Pintuji #sureshsharma #MeenaDeshkar #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.