सावली -
अवघे २५ वर्षे वय असलेल्या उच्चशिक्षित कु. यमुताई होमनाथ मेश्राम यांची ग्रापं वाघोली (बुट्टी) सरपंचपदी अविरोध निवड झाली. नवनिर्वाचित सरपंच यमुताई मेश्राम उच्चशिक्षित असून शिवाजी महाविद्यालय गडचिरोली मधून त्यांनी बीएससी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर मधून त्यांनी एमएससी (Zoology) केले आहे. तब्बल २० वर्षानंतर वाघोली (बुट्टी) या गावाला सरपंच पदावर उच्चशिक्षित आणि अविरोध निवड झालेल्या पदामुळे गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गावाचा सर्वांगीण विकास करणे, गोरगरिबांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या कामांना प्रथम प्राध्यान्य देणे व शिक्षणाच्या माध्यमातून एखादी अधिकारी बनून त्यात सुद्धा गावसेवेचे व्रत समोर ठेऊन विकासकार्यांना प्राधान्य देण्याचे आश्वासन नवनिर्वाचित सरपंच कु. यमुताई मेश्राम यांनी दिले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.