- माजी आमदार अँड संजय धोटे यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी
राजुरा -
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा,कोरपणा,गोडपिपरी व जिवती तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील ठिकाणी नैसर्गिक आपत्ती व झालेल्या अतिवृष्टी पावसाने बहुतांश नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व विज पडून अनेकाची घरे कोसळली तसेच शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. या बाबतीत अजूनही मोहबदला मागील दोन वर्षापासून मिळालेला नाही.सद्यस्थितीत माहे जुलै महिन्यात दिनांक १९-७-२१ते २२ -७-२१ या कालावधीत पावसाने हजेरी लावत नुकसान केलेले आहे.
शेतकरी कष्टकरी वर्ग आधिच अतिवृष्टी,सततची नापिकी,कर्जबाजारीपणा ईत्यादी कारणांमुळे हवालदिल झालेले असुन काही गावात विज पडून घरे जळाले आहे.तर अनेक गावात अतिवृष्टी ने घरे कोसळली आहेत.एवढेच नाही तर विजेमुळे शेतकरी व शेतकऱ्यांचे औताचे बैल मरण पावल्याने ऐन हंगामाचे दिवसात शेतकऱ्यांच्या कुटुंबापूढे मोठी आर्थिक वा ईतर समस्या निर्माण झाली आहे.
दिनांक २१जुलै २१ ते २२जुलै २२ या दोन दिवसात राजुरा विधानसभा क्षेत्रातील झालेल्या तालुक्यात अतिपावसाने अनेकाचे नुकसान झाले आहे.या पावसामुळे अनेकाचे घरात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.काही ठिकाणी जनावरे वाहून सुध्दा घेल्याचा घटणा घडल्या आहे.तसेच राजुरा तालुक्यातील एक व्यक्ती पाण्यात वाहून गेल्याची घटणा घडली असून यापरिस्थितीत त्वरित मदत करणे आवश्यक असुन,या संदर्भात तातडीने पंचनामे करून शासनाच्या माध्यमातून त्वरित आर्थिक नुकसान भरपाई द्यावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार याना निवेदनाद्वारे केलेली आहेत,तसेच सद्यस्थितीतील नैसर्गिक व अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान संदर्भात मौका चौकशी करून त्वरित पंचनामे करण्यात यावे अशीही मागणी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.