Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विरूर स्टे येथे पुरामुळे अडकून पडलेल्या दोन शेतकऱ्यांनी झाळावर काढली रात्र
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चिंचाळा पूल वाहून गेल्याने डोंगरगाव भेंडला मार्ग बंद राजुरा तालुक्यात अनेक घरांचे नुकसान ; शेकडो घरांची परस्थिती बिकट शेतशिवरात पूर स्थिती न...
  • चिंचाळा पूल वाहून गेल्याने डोंगरगाव भेंडला मार्ग बंद
  • राजुरा तालुक्यात अनेक घरांचे नुकसान ; शेकडो घरांची परस्थिती बिकट
  • शेतशिवरात पूर स्थिती निर्माण झाल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान
  • डोंगरगाव डम्प ओव्हरफ्लोव
  • वाचा सविस्तर.....

अविनाश रामटेके / विरेन्द्र पुणेकर - टीम आमचा विदर्भ
राजुरा / विरूर स्टे.
मंगळवार पासून सुरु झालेल्या पावसाने बुधवार रात्रीपासून जोर धरला, संपूर्ण परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण तालुक्याला या पुराचा तडाखा बसला. राजुरा तालुक्यातील भेदोडा येथील चंदू बिल्लावार वय 55 हा शेतकरी गावाजवळील नाल्यावर आलेल्या पुरात आपल्या दुचाकी गाडीसह वाहून गेला. गुरुवारला दुपारी ३ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. चंदू हा गावाकडे मोटरसायकलने जात होता. भेदोडा नाल्याला पूर असतांनाही त्याने आपली दुचाकी पाण्यात टाकली आणि क्षणार्धात तो पुरात दुचाकीसह वाहून गेला, अशी माहिती प्राप्त झाली आहे. राजुरा पोलीस घटनास्थळी पोहोचली असून शोध घेणे सुरू आहे. या शेतकर्‍याची हेल्मेट पुलाजवळ अडकून राहिल्याने मिळाली. या शेतकर्‍याचे गावात कृषी केंद्र आहे.
विरूर स्टे. येथे गुरुवारी विरुर नाल्याजवळ दोन शेतकरी यशवंत उपरे व नामदेव चिडे हे आपले गुरे आणण्यासाठी गेले असता नाल्यावर पाणी वाढल्याचे पाहून ते नाल्या काठी असलेल्या झाडावर चढून गेले. रात्रभर पाणी ओसरण्याची वाट बघत ते दोघे शुक्रवारी पहाटे घरी सुखरूप परतले. दोघांना घरी सुखरूप पोहोचल्याचे पाहून घरच्यांना आनंदाश्रू आवळता आले नाही. 

गुरुवारी सिर्सी नाला काल भरून गेल्याने विरुर मार्गे तेलांगाणाकडे जाणाऱ्या व इतर ३० ते ४० वाहने नाल्याजवळ अडकली त्यामुळे प्रवाशांना अखी रात्र पावसातच राहावे लागले. सकाळी पाच वाजता नाल्याचे पाणी ओसरल्याने विरुर राजुरा मार्ग पुन्हा सुरू झाला.  
सलग तीन दिवसपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या नाले रुद्ररूप धारण करीत आहे. नाल्यांच्या पाण्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचा नुकसान केल्यामुळे परिसरातील शेतकरी हा पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडल्याचे दिसून येत आहे. यावर्षी तरी चांगले पीक येईल या आशेने परिसरात कापूस, सोयाबीन व तूर या पिकाची लाखो रुपये खर्चून शेतकरी लागवड केली मात्र मागील दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने शेतातील इतर साहित्यासह पीक ही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.  

गुरुवारच्या संततधार पावसामुळे डोंगरगाव डॅम ओव्हरफ्लो झाल्याने विरुर व विरुरनजीक गावाच्या नाल्याला पूरस्थिती निर्माण झाली त्यामुळे चाळीस गावाचा संपर्क तुटला तसेच भेंडाला चिंचाळा मार्ग डॅम च्या ओव्हरफलो च्या प्रवाहात वाहून गेला त्यामूळे त्या मार्गाची वाहतुक प्रभावीत झाली, सिर्सी नाला भरून वाहत असल्याने काल रात्रो विरुरकडे व तेलंगणाकडे जाणाऱ्या प्रवाशांना रात्र भर आपल्या वाहणासह नाल्यावरच राहावे लागले, यावेळी विरुर पोलसानी काही नागरिकांना सुखरूप विरुर गावात पोहोचविले. अतिवृष्टी बघता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील चोवीस तास नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधान राहण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. 
राजुरा तालुक्‍यातील हिरापूर, निमनी, बाखर्डी, धूनकी, लखमापूर या भागात मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचे स्वरुप आले आहे. हिरापूर येथील शेतकरी पंढरी लोहे, यांचे शेत नाल्याला लागुन असल्याने. नाल्याचे पाणी शेतात गेल्यामुळे दहा एकर कपाशी व पाच एकर सोयाबीन खरडुन गेली व काही भागात पाणी साचले आहे. अती पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे हिरापूर, नांदगाव, निमनी, चिंचोली व परीसरातील गावांमध्ये बुधवार व गुरुवार संतत दिवसभर मुसळधार पाऊस येत आहे. त्यामुळे नाल्यांना पूर आल्याने नाल्याकाठच्या शेतकऱ्यांना चांगलाचा फटका बसला आहे. कुठे शेतात पाणी साचले तर कुठे कपाशी खरंडुन गेली. हिरापूर येथील शेतकरी पंढरी लोहे, गणेश कोंडेकर, कपिल लोहे व इतर यांची शेती त्याच शिवारात असल्याने व नाल्याला लागून असल्याने याना देखील चांगलाच फटका बसला आहे. नाल्याच्या पुराचे पाणी शेतात आल्याने त्यांच्या नाल्यालगतच्या दोन एकर शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. शिवाय पाण्याच्या प्रवाहामुळे या शेतातील कपाशीचे पिकही खरडुन गेले त्यामुळे त्यांच्यावर चांगलेच आर्थिक संकट ओढवले आहे. या मुसळधार पावसाचा फटका परिसरातील हिरापूर, निमनी, धूनकी, लाखमपूर या शिवारातील शेतकऱ्यांना बसला आहे. कारण सर्वदूर परसलेल्या या मुसळधार पावसामुळे काही शिवारातील नाल्यांना व नदीला पूर आले आहे. काहींच्या शेतात पावसाचे पाणी साचले असून काहींची शेती पिकांसह खरडून गेली आहे. कोची शिवेतिल हरिदास गुरुजी पहानपटे शेत सर्वे नंबर १०५ या शेतातील तिन एकर सोयाबीन नाल्याच्या पुराने वाहुन गेले. 
सास्ती येथील योगिता भीमराव दुर्योधन यांचे घर गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान पाण्याने पडले. रात्रभर घरातील तीन व्यक्ती त्याच पडक्या घरात होते. शुक्रवारी दुपार पर्यंत प्रशासनाच्या कोणत्याही विभागाने त्यांची विचारपूस केली नाही, मायबाप प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. पेठ वॉर्ड राजुरा येथील गीताबाई टेकाम ह्यांच्या घराची भिंत अतिवृष्टी मुळे पडली. तसेच पेल्लोरा येथील विजय खुजे यांच्या घराची भिंत पाऊसामुळे पडली. 
कळमना गावातील मारुती कोंडू विदे व मधुकर जगन्नाथ बलकी यांच्या राहत्या घरांच्या भिंती पडली. भिंत पडल्याने  कुटुंबाची तारांबळ उडाली तसेच या अतिवृष्टीमुळे गावातील वस्तीमध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसून अन्नधान्याची शेतीच्या खताची जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले. तसेच तालुक्यात अनेक लोकांच्या घरांची पडझळ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने या नुकसानग्रस्त शेतांची, घरांची पाहणी करून शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top