Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "देव तारी त्याला कोण मारी" पुल ओलांडताना पाण्यात वाहून गेला युवक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील घटना ; बघा व्हिडीओ नशिबाने वाचले जीव धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - मंगळवारपासून सु...
  • कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील घटना ; बघा व्हिडीओ
  • नशिबाने वाचले जीव

धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाच्या झळीमुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच नदी नाले तुडुंब भरले असून परिसरातील अनेक नाल्याचे पाणी पुलाच्यावरून वेगाने वाहत आहे. कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील मुख्य चौकातून नांदा गावात जाणारे रस्त्यावरील दोन्ही पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे दोन्हीकडे लोकं अडकुन बसली आहे. पण काही अती उत्साही युवकांनी पुलावरून वेगात वाहत असलेल्या नाल्याला ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसले. नुकतीच दारू सुरू झाली असल्यामुळे काही मद्यप्रेमी नशेच्या अवस्थेत ही पुलावरून वाहत्या नाल्याला ओलांडण्याचे हिम्मत दाखवीत होते. अनेक लोकांनी थांबवल्यानंतरही नाला पार करण्याच्या धाडस केल्याने नांदा येथील दिलीप चिलमुलवार वय 29 नावाच्या युवकाने वेगात पाणी वाहत असलेल्या पुल ओलांडताना घसरून खाली पडल्यामुळे पाण्या सोबतच प्रवाहात वाहून गेला. तिथे उपस्थित अनेक लोकांनी त्याला वाहत असताना बघितले आणि ओरडा-ओरड सुरू झाली. सुदैवाने पाण्याच्या वेगाने  त्याला बाहेर फेकल्या मुळे तो नाल्या लगतच्या एका शेतातील एका झाडाला अडकल्याने त्याचा जीव वाचला. लगेच नांदा निवासी हरीश खंडाळे नावाच्या युवकाने आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून त्या वाहुन जात असल्या युवकाला पाण्यातून बाहेर काढले. कालची घटना बघून खरंच म्हणता येईल की, 'देव तारी, त्याला कोण मारी' त्या घटनेनंतर ही अनेक लोक पाण्यातून आपली वाट काढल्याचे चित्र दिसत होते.







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top