Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ब्रेकिंग न्यूज - राजुरा - गडचांदूर मार्ग बंद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खामोना जवळील पुलावर तब्बल ५ फूट पाणी : वाहतूक ठप्प विरेन्द्र पुणेकर / धनराजसिंह शेखावत - टीम आमचा विदर्भ राजुरा - गडचांदूर - मान्सूनने चांगल...
  • खामोना जवळील पुलावर तब्बल ५ फूट पाणी : वाहतूक ठप्प
विरेन्द्र पुणेकर / धनराजसिंह शेखावत - टीम आमचा विदर्भ
राजुरा - गडचांदूर -
मान्सूनने चांगलाच जोर पकडला आहे. मुसळधार पावसाने सलग दोन दिवस हाहाकार उडविला आहे. बुधवार दुपारपासून सर्वदूर पडत असलेल्या पावसाने रात्री पासून जोर धरल्याने नद्या, नाले, पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. काल दुपारपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहे. आज दुपारी १ वाजताच्या दरम्यान खामोना जवळील नाल्यावरून ५ फूट वरून पाणी वाहत असल्याने राजुरा - गडचांदूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वाहतूक ठप्प झाल्याने पुलाचा दोन्हीकडे वाहनांचा रांगा लागल्या आहे. पोलिसांचा येथे पहारा सुरु आहे. याच मार्गावरील आर्वी गावाच्या नाल्यावरील पुलाला लागून पाणी वाहत असल्याची माहिती मिळाली आहे. गोवरी कॉलनी ते कढोली व पोवनी ते कढोली जाणाऱ्या मार्गावरील पुलाला लागून पाणी वाहत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली. कढोली परिसरातील एक इसम मिसिंग असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कोरपना तालुक्यातील नांदा रोड वरील दोन्ही पुलावरुन पाणी वाहत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ग्राम पंचायत नांदा परिसरात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक भागात पाणी साचले आहे. काही ठिकाणी शेतशिवारात तर घरांत पाणी शिरले आहे.






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top