- तब्बल ३०० नागरिकांनी घेतला लसीकरणाचा लाभ
राजुरा -
आता गाव खेड्यावर कोविड लसीकरण मोहीम जोरात सुरू असून शनिवार दिनांक १७ जुलै रोजी लसीकरण मोहीम सास्ती येथील ग्राम पंचायत कार्यालयात ठेवण्यात आली होती. सकाळी 10 वाजता या लसीकरण मोहिमेचे उदघाटन सरपंच रमेश पेटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच कुणाल कुडे, ग्राम पंचायत सदस्य नरसिंग मादर, संगीता चन्ने, मंगेश लांडे, माया भटारकर, सुशीला आत्राम, लक्ष्मी नल्ली, राजकुमार बोगा. बेबीनंदा चिंतला, ग्रामपंचायत सचिव, प्राथमिक आरोग्य केंद्र कढोलीचे डॉ. शिवकुमार दुधे, पर्यवेक्षक अनुराधा भगत, आरोग्य कर्मचारी किरण वाकुलकर, निलू मल्लेरवार, अनिल देठे, सोहेल शेख, श्यामलता गाडगे, सुरेश कुंभारे उपस्थित होते.
या लसीकरणाची सुरवात जेष्ठ नागरिकांना लस देऊन करण्यात आली. एकूण ३०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. गावातील तरुणांनी सुद्धा या लसीकरण मोहिमेला सहकार्य केले. गावात ग्रामपंचायतने लसीकरणाआधी केलेल्या जनजागृतीमुळे जनतेची उत्स्फुर्त पणे साथ मिळाली व सकारात्मक दृष्टिकोन दाखवून लसीकरनाला सास्ती वासीयांनी सहकार्य केले त्याबद्दल सरपंच रमेश पेटकर यांनी गावकऱ्यांचे आभार मानले. गाव सुदृढ, सशक्त व निरोगी रहावा यासाठी ग्रामपंचायत सास्ती नेहमीच जनहितार्थ अग्रेसर राहत असल्याची ग्वाही पण त्यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.