Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अनिल देशमुख यांना आणखी एक धक्का
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागपुर मधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीचा छापा आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नागपूर - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींम...
  • नागपुर मधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीचा छापा

आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. अनिल देशमुख यांच्या नागपुर मधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. यामध्ये आता काय माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
नागपूर जिल्ह्याच्या काटोल नरखेड तालुक्यातील वडाळी वडाविहिरा इथे अनिल देशमुख यांची वडिलोपार्जित काही जागा आहे, घरं आहेत, यावर अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून इथे सर्च मोहीम सुरू आहे. यामध्ये काय माहिती समोर येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top