Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जलाराम मंदिर लसीकरण केंद्रात १५९ नागरिकांनी घेतले लसीकरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि महानगर पालिका द्वारे लसीकरण केंद्रात उत्फुर्त प्रतिसाद शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपू...
  • फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि महानगर पालिका द्वारे लसीकरण केंद्रात उत्फुर्त प्रतिसाद

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
लसीकरण मोहिम वेगाने सुरू असून शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्रही वाढविण्यात आले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी जास्तीत जास्त प्रमाणात लस घ्यावी यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता आपल्या क्षेत्रातील पात्र नागरिकांचे पूर्ण लसीकरण व्हावे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असे फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रामकिशोर सारडा यांनी सांगितले. 
शनिवारी गंज वॉर्डातील जलाराम बाप्पा मंदिरात फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि महानगर पालिका द्वारे लसीकरण केंद्रात नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद दिसून आला या लसीकरण केंद्रावर १५९ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. यावेळी आरोग्य विभागाच्या चमूसह रामकिशोर सारडा, रामजीवन परमार, चिराग नाथवाणी, मनीष राजा, प्रभाकर मंत्री, अजय कोतपल्लीवार, दिनेश नथवाणी, दिनेश बजाज उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top