Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शासनाचे लाखो रुपये पाण्याच्या टाकीत गायब
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बारा वर्षांपासून मार्की (बु) पाण्याच्या टाकीचे बांधकाम अपूर्ण प्रेमकुमार नरडलवार - आमचा विदर्भ प्रतिनिधी झरी जामनी - तालुक्यातील मार्की (बु)...

  • बारा वर्षांपासून मार्की (बु) पाण्याच्या टाकीचे बांधकाम अपूर्ण

प्रेमकुमार नरडलवार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
झरी जामनी -
तालुक्यातील मार्की (बु) या गावात २००५ ते १० काळात पाणीपुरवठा विभाकडून ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी आला. मात्र त्या निधीत अफरातफर झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचे चित्र दिसत आहे. १२ वर्षापासून काम पूर्ण का झाले नाही ? असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

सामान्य माणसाच्या पाणी कर, घर कर व इतर कराच्या माध्यमातून शासन व्यवस्था चालत असते. याच कराचा वापर करून शासन सामान्य हितासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या गोष्टीची पूर्तता करते. ह्याच करातून केलेले काम लाखो रुपये खर्च करून १२ वर्षापासून मार्की (बु) येथील पाण्याच्या टाकीचे काम होत नसेल तर याला म्हणायचे तरी काय. प्रशासकीय अधिकारी करताय तरी काय? असा प्रश निर्माण होत आहे.

मार्की (बु) गावातील पाणी पुरवठा करण्यासाठी २००७ या वर्षी पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे काम करण्यात आले. मात्र हे काम काही पाणी पुरवठा समिती मधील पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्याने मिळून पूर्ण करायचे होते. मात्र शासनाचे लाखो रुपये येऊन सुद्धा हे काम का अपूर्ण राहिले हे अजूनही एक रहस्य आहे.

या कामासाठी गावात पाणीपुरवठा समिती स्थापन केली गेली होती त्या गावातील एक व्यक्ती अध्यक्ष तर सचिव म्हणून एक महिला होती. सर्व आलेला निधी हा समितीच्या खात्यात जमा होत होता.त्यातूनच सर्व व्यवहार चालत होते. अजूनही या पाणीपुरवठा समितीकडे गावातील पाणीपुरवठा करायचे काम आहे. तरी सुद्धा महावितरण चे पाच लाख रुपये थकीत असल्याने कधीही लाईट कट केल्या जाते व मोटार सुद्धा बंद होत असते. यामुळे नागरिकांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागत आहे. हाच प्रकार मागील १२ वर्षपासून सुरू आहे. मात्र तरी सुद्धा कोणताही अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाही. 

माञ शासनाने लाखो रुपये हे पाण्यात गेले हे चित्र मात्र गावात प्रवेश करताना पाण्याच्या टाकीकडे बघून दिसत आहे. या टाकीच्या बांधकामाच्या अपूर्ण कामाकडे बघून गावातील नागरिकांनी सुद्धा पाणी कर जमा करण्यास मनाई होत आहे.या प्रकारामुळे नागरिकांचा शासन व्यवस्थेवरून विश्वास उडणार तर नाही ना. अनेक सरपंच व सचिव आले आणि गेले .मात्र अजून या बाबत कुणीही तोळगा काढू शकले नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या कामात हलगर्जीपणा करणार्यांवर शासन नियमानुसार दंडात्मक कारवाही करून लाखो रुपये वसूल करावे अशी मागणी गावातील नागरिकडून होत आहे.

बातम्या अधिक आहेत....

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top