Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दिव्यांग बांधवासांठी स्वतंत्र लसीकरण केंद्र तयार करा - आ. किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी चर्चा करत केल्या सुचना शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण हा एकमा...

  • जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी चर्चा करत केल्या सुचना

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण हा एकमात्र उपाय आहे. त्यामूळे समाजातील सर्व घटकांना कोणत्याही अडचणी शिवाय लसीकरण करता यावे या दिशेने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करत दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्या आहे.

कोरोनाची संभावित तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आज पासून निर्बंध कडक केले आहे. याच पाश्र्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेतली असून अनेक सुचना केल्या आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेत मुबलक संसाधनांअभावी चंद्रपूरकरांना मोठी किंमत चुकवाली लागली आहे. त्यामूळे तिसरी लाट येण्याआधिच योग्य उपायोजना करण्याच्या दिशेने प्रशासनाने उपाययोजना करायला सुरवात केली आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे. यावेळी लसीकरणावर जोर देत अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याच्या सुचना केल्या आहे. लसीकरण मोहिमेत दिव्यांग बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी विषेश प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. तसेच दिव्यांग बांधवांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र लसिकरण केंद्र तयार करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या आहे. या लसीकरण केंद्राबाबत व येथील लसींच्या साठ्याबाबतची माहिती दिव्यांग बांधवांना मिळत राहावी अशी यंत्रणाही सुसज्ज करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.

बातम्या अधिक आहेत.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top