Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विष प्राशन करून शाळेतील चपराशीने केली आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यातील धानोरा येथील घटना अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी विरूर स्टेशन - राजुरा तालुक्यातील धानोरा लगत असलेल्या जंगलात आज ...

  • राजुरा तालुक्यातील धानोरा येथील घटना
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन -
राजुरा तालुक्यातील धानोरा लगत असलेल्या जंगलात आज 28 जून रोजी दुपारच्या सुमारास एका चाळीस वर्षीय इसमाचा मृत्युदेह आढळल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली. 

मिळालेल्या माहीतीनुसार राजुरा येथील बंडू प्रभाकर लोनगाडगे वय 40 हे गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथील किसान विद्यालय येथे चपराशी म्हणून कार्यरत होते आणि शाळेत ये-जा करिता नेहमीच धानोरा मार्गाने तो मार्गक्रमण करीत होते. मात्र शाळा बंद असल्याने शाळेची देखरेखी करिता मागील पंधरा दिवसापासून वेडगाव इथेच राहत होते. आज राज्यात संपूर्ण शाळा सुरू झाल्या आज शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांना शाळेत येणे आवश्यक होते मात्र ते शाळेत न आल्याची माहिती मिळाली.

विरुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धानोरा-कवीटपेट जंगलात आज दुपारच्या सुमारास नागरीकांनी बंडू चा मृत्यदेह बघितला तेव्हा तात्काळ विरूर पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पीएसआय वडतकर, पोलीस हवालदार कुरसंगे, वागधारकर, मडावी, मुंडे यांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी फवारणी चे औषधीं व दारूची बाटली आढळुन आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचे नोंद करून मृतदेह राजुरा येथिल उपजिल्हा रुग्णालयात उत्तरोत्तर तपासणीकरिता पाठविला. मात्र आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. 

बातम्या अधिक आहेत....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top