Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अबब कवठीमध्ये "रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते....."
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कवठी गाव विकासापासून कोसो दूर ग्रामपंचायत प्रशासनाने केले हात वर ग्रामपंचायत प्रशासन निद्रा अवस्थेत ग्रामपंचायत प्रशासनाचे उडवा उडवीचे उत्तर...

कवठी गाव विकासापासून कोसो दूर
ग्रामपंचायत प्रशासनाने केले हात वर
ग्रामपंचायत प्रशासन निद्रा अवस्थेत
ग्रामपंचायत प्रशासनाचे उडवा उडवीचे उत्तरे....
गावकऱ्यांनी मग दाद मागायची तरी कुणाकडे?

सुनील किनेकार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
सावली -
सावली तालुका हा प्रगतिशील तालुका आहे असे अनेक लोकांच्या मुखातून एकाला मिळते मात्र सावली पासून अवघ्या ७ किमी अंतरावर असलेल्या कवठी गावाचे चित्रच विदारक आहेत. कवठी गावाचा विकास हा कोसो दूर आहे असे बघायला मिळत आहे.

सावली-कवठी-हरणघाट-चामोर्शी तसेच उसेगाव कवठी चामोर्शी-मूल हा रहदारीचा रस्ता कवठी गावातूनच जात असलेल्या ठिकाणी आणि महत्वाचे म्हणजे कवठी गावातील संपूर्ण रोडची अवस्था सर्वात बिकट झालेली आहे. गावातील रस्ते पूर्णपणे खड्डेमय झालेले आहेत. पावसाळ्यात त्याच खड्ड्यात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने सर्व रस्ते चिखलमय झाल्याने गावातील नागरिकांना आपले जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे कवठी वाशीय नागरिक हे मोठ्या प्रमाणात प्रशाशनावरती नाराज दिसून येत आहेत. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य करताना प्रशासन आढळून येताना दिसत आहे.

काही सामाजिक कार्यकर्ते हे स्वता ग्रामपंचायत कवठी इथे जाऊन तिथल्या अधिकारी वर्गाना विचारणा केली असता ते सरळ हात झटकून गावातील संपूर्ण रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये पैसेच नाही, करू हळू हळू, तुमच्या घाईलाच काम होणार आहेत काय? असे बोलून मोकळे होताना दिसले. असे उडवाउडवीचे उत्तरे ग्रामपंचायत सरपंच, आणि इतर पदाधिकारी वर्गाकडून मिळत असल्याने नागरिकांच्या मनात आता दाद कुणाकडे मागायची, या रोडची दखल घेणारा कोणी वाली आहे कि हा रोड राम भरोशे राहणार असा हि प्रश्न निर्माण झालेला आहे.

कवठी येथे ग्रामीण रुग्णालय उपकेंद्र असल्याने सरकारी हॉस्पिटल मध्ये एकाध्या गर्भवती महिलेला प्रसुस्ती साठी नेताना तारेच्या कसरत केल्या सारखं न्याव लागतो आहे. त्यामुळे त्या महिलेच्या तसेच तिच्या बाळाला जीवन मरण्याचा प्रश्न उदभवत आहे. सोबतच गावात बाजूलाच छोट्या मुलांचे दोन अंगणवाडी केंद्र व जिल्हा परिषद शाळा आणि शहीद सुरेश पाटील सुरकर विद्यालय असताना तेथील विद्यार्थ्यांना ऐ- जा करण्यासाठी आपलं जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. तरी सुद्धा अश्या जीव घेणाऱ्या खडयांना बुजविण्याकरिता कोणतीही यंत्रणा सामोरे होताना दिसत नाही. त्यामुळे खरोखरच कवठी गाव हा विकासापासून तसेच रस्त्यातील खड्डे बुजिवण्यात ग्रामपंचायत पूर्णपणे अयशस्वी ठरलेली आहे. असे सामाजिक कार्यकर्ते यांचे मनोगत आहे. अश्या रस्त्यांची ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन गावातील रस्ते दुरुस्ती करण्यात यावे. अशी मागणी कवठी वाशीय जनतेची आहे. असे न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराच गावातील नागरिकांनी दिलेला आहे हे विशेष.

गावातील रस्ते पूर्णपणे खड्डेमय व चिखलमय झालेले असल्याने खड्ड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे काहीच कळत नाही यामुळे आतापर्यन्त अनेक नागरिकांचा अपघात झालेला आहे. यावर ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार विचारणा करून संपूर्ण रत्यावरील खड्डे बुजवीन्याकरिता विनंती करून केली असता ग्रामपंचायत मध्ये पैसेच नाही, करू हळू हळू, तुमच्या घाईलाच काम होणार आहेत काय? असे उडवा उडवीचे उत्तरे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व इतर पदाधिकारी यांनी देऊन आपले हात झटकून मोकळे होतात. जीवघेणे खड्डे लवकरात लवकर न बुजविल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर नागरिकांच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल.
टिकाराम पि. म्हशाखेत्री

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top