कोरपना -
स्कॉलर सर्च अकॅडमी कोरपना इथे ओबीसी समिती शाखा कोरपना व बामसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने 27 जून रोजी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची 147 वी जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रम ठेवण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजी. दिलीप झाडे संचालक सर्च फाउंडेशन कोरपना यांनी मार्गदर्शन केले. संजय बोधे वरोरा व अँड. भूपेंद्र रायपुरे भद्रावती यांनी सुद्धा मार्गदर्शन करत ओबीसी आरक्षणा बद्दल अनेक माहिती दिली. ओबीसी यांना आरक्षण मिळाले पाहिजे व जनगणना झालीच पाहिजे, असे एकमत प्रबोधन करीत असताना करण्यात आले. याप्रसंगी ओबीसी बांधव यांनी 12 ते 5 वाजेपर्यंत सतत दिवसभर कार्यक्रमचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे आयोजक प्रभाकर गेडाम कातलाबोडी, हरिदास गौरकर हे होते. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला उपस्थित होते.
बातम्या अधिक आहेत.....
बातम्या अधिक आहेत.....
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.