Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राकाँ ने पंसच्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यात भरला जोश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
साक्री तालुक्यातील पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची बैठक संपन्न चिन्मय देवरे - आमचा विदर्भ प्रतिनिधी धुळे - ...

  • साक्री तालुक्यातील पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
चिन्मय देवरे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
धुळे -
येणाऱ्या जुलै महिन्यात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील 9 पंचायत समितीच्या गणांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन व विचारविनिमय करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आण्णासाहेब अनील गोटे व धुळे जिल्हा पक्ष निरीक्षक अर्जुन टिळे यांच्या मार्गदर्शन  व सूचनेनुसार 28 जून रोजी अंगणवाडी सेविकांची सह. पतसंस्था येथे राकाँ कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पक्षाचे सरचिटणीस सुरेश सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, जिप विरोधी पक्ष नेते पोपटराव सोनवणे, साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र मराठे, पंस साक्रीचे उपसभापती अँड. नरेंद्र मराठे, धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रा. नरेंद्र तोरवणे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरसाठ, भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष धनराज शिरसाट, राष्ट्रवादी कॉंग्रेस विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश साळुंके, पिंपळनेरचे उपसरपंच विजय गांगुर्डे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले.

तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थीत राहण्याचे आवाहन साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या वतीने करण्यात आले होते. अंगणवाडी सेविकांची सह. पतसंस्था, पेरेजपूर रोड, साक्री येथे घेण्यात आली. सदर बैठकीस महिला तालुकाध्यक्ष श्रीमती रोहिणी कुवर, साक्री विधानसभा क्षेत्रप्रमुख विलास देसले, माजी सभापती सचिन बेडसे, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष करीम शहा, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष भैय्या साळवे, महिला आघाडी जिल्हा संघटिका श्रीमती संजीवनी गांगुर्डे, राकाँ तालुकाध्यक्ष कल्पेश सोनवणे, राष्ट्रवादी सेवादल तालुकाध्यक्ष अँड. सुनील नांद्रे, लीगल सेलचे तालुकाध्यक्ष अँड. वाय.पी. कासार, किसान सेलचे तालुकाध्यक्ष सयाजी ठाकरे, तालुका उपाध्यक्ष गिरश नेरकर, शाना बच्छाव, अजित बागुल, गणेश देवरे, प्रविण देसले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सोशल मीडिया जिल्हा समन्वयक आदेश साळुंके, अक्षय सोनवणे, हेमंत ठाकरे, पंकज भामरे, पवन संदानशीव, पंकज खैरनार, सतिष बाविस्कर, पंकज सोनवणे,

विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष गितेश पाटील, दिलीप पवार, विजय पाटील, विद्यार्थी आघाडी साक्री शहराध्यक्ष पराग (मयूर) आहिरराव, तालुका उपाध्यक्ष युवराज चव्हाण, युवक काँग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी विकास ढिवरे, अक्षय सोनवणे, हर्षवर्धन अहिरे, अंकित अहिरराव, मनोज शेवाळे, योगेश पाटील, राहुल वाघ, मिलिंद पाटील, चारुशीला बेडसे, सुजाता साळुंके, गितेश पाटील, चिन्मय देवरे, संजय शिंदे, राहुल जिरेपाटील, प्रशांत पवार, अजय पवार, संदीप सुर्यवंशी, तेजस तोरवणे, किरण बच्छाव, विपुल पाटील, दरेसिंग माळीच यांच्यासह सर्व पदाधिकारी व नव्याने पोटनिवडणुका होणाऱ्या ९ पंचायत समिती गणांमधील इच्छुक उमेदवार उपस्थित होते. याप्रसंगी प्रत्येक गणातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी साठी मागणी केली. संचालन प्राध्यापक नरेंद्र तोरवणे यांनी तर आभार गिरीश नेरकर यांनी केले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top