Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: येरगव्हान येथे घाणीचे साम्राज्य
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी (ग्रामीण) राजुरा - 'स्वच्छ भारत...स्वच्छ शहर' चा नारा देत आपले शहर, गाव स्वच्छ ठेवण्...

विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी (ग्रामीण)
राजुरा -
'स्वच्छ भारत...स्वच्छ शहर' चा नारा देत आपले शहर, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊन शहर, गाव स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, येरगव्हान गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छते कडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती अन शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात कोरोनाच्या फैलावाला रोखता रोखता दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे. गावातील संपूर्ण नाल्या, गटारी भरून असून काही ठिकाणी नाल्यांच्या वरती पाणी निघून जात आहे. त्यामुळे गावातील नागरिक त्रस्त असून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी सरपंच व ग्रामसेवक कडे वारंवार तक्रार, व कोरोना काढात पत्रव्यवहार करून सुद्धा याकडे ग्रामपंचायत चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

असल्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या स्वस्ताला धोका नाकारता येत नाही. येरगव्हान येथे वारंवार अस्वच्छते कडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने गावातील नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण होत आहे. तात्काळ नाले सफाई व नाले दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली असून यावर तात्काळ उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा येरगव्हान वासियांकडून देण्यात आला आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top