Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सहाय्यक व्यवस्थापकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बाप-लेकांनी युवकाला ७ लाखाचा गंडा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पोलिसांनी बापलेकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा केला दाखल आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नागपूर - सहाय्यक व्यवस्थापकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दा...

  • पोलिसांनी बापलेकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा केला दाखल

आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
सहाय्यक व्यवस्थापकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बाप-लेकांनी युवकाला ७ लाख रुपयांनी गंडा घातला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी बापलेकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अशोक शेषराव उके (वय ६३) आणि गौरव अशोक उके (वय २६, दोन्ही रा. अशोक ले आऊट, सुराबर्डी), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विक्रम दिलीप रतनानी (वय ३०, रा. क्वेटा कॉलनी) याच्यातक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम याचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले आहे. तो शिकवणी वर्ग घेतो. गतवर्षी त्याची गौरव याच्यासोबत ओळख झाली. मुंबईतील कोटक महिंद्रा बँकेत सहाय्यक व्यवस्थापक अथवा संस्थाधन अधिकारी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष गौरव याने विक्रम याला दाखविले. काही दिवसांनी गौरव व त्याचे वडील विक्रम याला भेटले. त्याच्याकडून ७ लाख रुपये घेतले. त्याला बनावट नियुक्तीपत्र दिले. मात्र, टाळेबंदी असल्याने तुला मुंबईला जात येणार नाही. तुला पगार मिळेल, असे गौरव याने विक्रमला सांगितले. सुरुवातील गौरव याने विक्रम याच्या खात्यात दर महिन्याला २० हजार रुपये जमा केले. विक्रम याचा विश्वास संपादन केला. काही दिवसांपासून विक्रम याच्या खात्यात पैसे जमा होणे बंद झाले. चौकशी केली असता नियुक्तीपत्र बनावट असल्याचे त्याला कळले. विक्रम याने लकडगंज पोलिसांत तक्रार दिली. या बापलेकाने शशांक मेंघरे आणि पराग अस्सारपुरे या दोघांचीही १० लाख ४० हजार रुपयांनी फसवणूक केली.

वाचा अधिक बातम्या...

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top