- राजुरा पोलीस व कृषी विभाग यांची कारवाई
- शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बियाणे न लावण्याचे आवाहन
दि. २५ जून रोजी राजुरा तालुक्यातील मौजा वरोडा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांचे पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना सादुजी गणुजी नांदेकर यांच्या शेतातील घरी बोगस चोर बीटी बियाणे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सदर ठिकाणाची पाहणी केली असता सुभाष विठ्ठल तुम्मेवार वय ४५ रा. रामपूर यांनी ४ पोते बोगस चोर बीटी बियाणे शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. या ४ पोत्यात कोहिनुर ५५५ वाणाचे ४५० ग्रामचे ४७ पाकीट प्रति पाकीट किंमत ७५० रु. एकूण ३५ हजार २५० रु., शक्तिगोल्ड वाणाचे ४५० ग्राम वजनाचे ४७ पाकिटे प्रति पाकीट ७५० रु. एकूण ३५ हजार २५० रु., जादू वाणाचे ४५० ग्राम वजनाचे ३३ पाकिटे प्रति पाकीट ७५० रु. एकूण २४ हजार ७५० रु., आर-६५९ वाणाचे ४५० ग्राम वजनाचे प्रति पाकीट ७५० रु. एकूण ३३ हजार ७५० रु., असे एकूण १७२ पाकिटे या प्रकारे एकूण १ लाख २९ हजाराचे बोगस चोर बीटी बियाणे जप्त करण्यात आले.
सदर कार्यवाही सहायक पोलीस निरीक्षक झुरमुरे, पोलीस उपनिरीकक्ष गेडाम, पोलीस शिपाई संघपाल गेडाम, अविनाश बोबडे, दिनेश मेश्राम, महीपत कुमरे, नारायण सोनुने, महेश माहूरपवार, कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी जी.डी. मोरे, तालुका कृषी अधिकारी व्ही.के. मकपल्ले, मंडळ कृषी अधिकारी सी.के. चौहान, कृषी पर्यवेक्षक नितीन कांबळे यांनी केली.
यावेळी राजुरा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना चोर बीटी बियाणे शेतकऱ्यांनी शेतात लावू नये. सदर बियाणे लावल्यास पर्यावरणास धोका निर्माण होतो त्यामुळे असे बियाणे न लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचा -
👌👌👌
उत्तर द्याहटवा