Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विज वितरण विभागाने स्थानिक समस्या तातडीने सोडवाव्यात - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रामपूर, धोपटाळा, सास्ती, गोवरी माथरा व परिसरातील विज समस्येवर आमदार धोटे यांची विज अधिकाऱ्यांसोबत बैठक आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी राजु...

  • रामपूर, धोपटाळा, सास्ती, गोवरी माथरा व परिसरातील विज समस्येवर आमदार धोटे यांची विज अधिकाऱ्यांसोबत बैठक
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर, धोपटाळा, सास्ती, गोवरी, माथरा व परिसरातील अनेक गावांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होते. आमदार सुभाष धोटे यांच्याकडे विज समस्या बाबत त्यांनी पाठपुरावा केला असता याची दखल घेऊन त्यांनी विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी या सर्व परिसरातील विज समस्येवर चर्चा घडवून आणली. यात परिसरासाठी स्वतंत्र फिडरची निर्मीती करणे, नवीन विद्युतीकरण करणे खराब व वाकलेले खांब दुरूस्ती करणे, लाईनमन बाबत च्या तक्रारींचे तातडीने निवारण करणे, ज्या शेतकर्‍यांनी कृषी पंप विज बिलाचा भरणा केला आहे त्याची विज जोडणी तातडीने करण्यात यावी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. क्षेत्रातील विज समस्येचे निवारण न झाल्यास मुख्य समस्यांबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे बैठक आयोजित करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आमदार सुभाष धोटे यांनी विश्रामगृह, राजुरा येथे आयोजित बैठकीत जाहीर केले. 

या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, विज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता महेश तेलंग, उपकार्यकारी अभियंता संतोष लोहे, कनिष्ठ अभियंता (जेई) अमित ठमके, विवेक ठाकरे, धोपटाळाचे सरपंच राजू पिंपळशेंडे, सास्तीचे रमेश पेटकर, रामपूर चे वंदना गौरकर, माजी सरपंच राजाराम येल्ला, लहू चहारे, रमेश कुडे, प्रा. प्रफुल्ल शेंडे, ग्रा प सदस्य जगदीश बुटले, रमेश झाडे, ब्रिजेश जंगीतवार, विलास कोदीरपार, सतीश चौधरी, स नि यो सदस्य कोमल पुसाटे, गोपाल बुरांडे, ऐकडे जी, सोमेश्वर बंडावार, प्रकाश भटारकर, गजानन वांढरे, शिवराम लांडे, मधुकर सोयाम, खनके यासह परिसरातील जवळपास ५० ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचा -

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top